करवंदजवळ दुचाकी घसरल्याने तरूणाचा मृत्यु

By अतुल जोशी | Updated: September 20, 2023 17:00 IST2023-09-20T17:00:30+5:302023-09-20T17:00:45+5:30

दिनेश गंभीर जखमी झाल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला.

A young man died after his bike fell off near Karvand | करवंदजवळ दुचाकी घसरल्याने तरूणाचा मृत्यु

करवंदजवळ दुचाकी घसरल्याने तरूणाचा मृत्यु

धुळे : मध्यप्रदेशातील सेंधवा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणाऱ्या प्रकाशा (ता. शहादा) येथील तरूणाची दुचाकी करवंद (ता. शिरपूर) येथे घसरून झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. दिनेश एकनाथ गुरव (वय २५, रा. प्रकाशा, जि.नंदुरबार) असे मयत तरूणाचे नाव आहे.

दिनेश एकनाथ गुरव  हा तरूण शिरपूर येथे मित्रांसोबत आला होता.  मित्रांना वेळ लागणार असल्याने,  दिनेश हा मित्राची दुचाकी गाडी घेवून सेंधवा येथील आप्तजणांना भेटण्यासाठी जात होता.  करवंद गावाजवळील अरूणावती नदी पूलावर दिनेशची  दुचाकी ( क्रमांक एमएच-३९-एएम-१४२९) घसरली.  त्यात दिनेश गंभीर जखमी झाल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला.

काहीवेळानंतर खाजगी वाहनाने त्यास शिरपूर  येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले  असता,  डॉ़. स्वाती राजपूत यांनी तपासून मृत घोषित केले.  याबाबत शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   तपास हेड कॅान्स्टेबल पी.पी.पाटील करीत आहे.

Web Title: A young man died after his bike fell off near Karvand