ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
By देवेंद्र पाठक | Updated: May 22, 2023 18:25 IST2023-05-22T18:25:25+5:302023-05-22T18:25:44+5:30
साक्री तालुक्यातील किरवाडे गावाजवळील घटना

ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
देवेंद्र पाठक, धुळे: भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची ट्रॅक्टरला धडक बसली. या अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसलेला तरुण फेकला गेल्याने त्याला डोक्यासह इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. ही घटना साक्री तालुक्यातील किरवाडे गावाजवळ रविवारी सायंकाळी घडली. एमएच १८ - बीआर ८९५५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४० - एन २०७२ क्रमांकाच्या ट्रकची जोरदार धडक बसली. त्यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसलेला देवा पिंडा सोनवणे (रा. सुरपान, ता. साक्री) हा तरुण रस्त्यावर फेकला गेला.
त्याला डोक्यासह हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. वैद्यकीय उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी मयत तरुणाचे वडील पिंडा सोनवणे (रा. सुरपान, ता. साक्री) यांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.