महिलेची सोनपोत दोघांनी ओरबाडली, देवपुरातील गजानन काॅलनीतील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: April 18, 2023 17:26 IST2023-04-18T17:25:24+5:302023-04-18T17:26:04+5:30
रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्या किराणा दुकानावर जात होत्या. त्याच वेळेस दोन अनोळखी तरुण भरधाव वेगाने दुचाकीवरून आले.

महिलेची सोनपोत दोघांनी ओरबाडली, देवपुरातील गजानन काॅलनीतील घटना
धुळे : किराणा दुकानाजवळ जात असताना कोणीही नसल्याची संधी साधून दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडली. ही घटना देवपुरातील गजानन कॉलनीत रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी सोमवारी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सरलाबाई संजय चौधरी (वय ४८, रा. गजानन कॉलनी, देवपूर) या महिलेने फिर्याद दाखल केली.
रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्या किराणा दुकानावर जात होत्या. त्याच वेळेस दोन अनोळखी तरुण भरधाव वेगाने दुचाकीवरून आले. त्यातील मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील १२ हजार रुपये किमतीची ७ ग्रॅम वजनाची मंगलपोत आणि ५० हजार रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण ६२ हजारांचा ऐवज ओरबाडून दोघांना दुचाकीने पोबारा केला. पळून गेलेले तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वयाेगटातील आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरली. याप्रकरणी सोमवारी दुपारी पावणे दोन वाजता देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. त्यानुसार, भादंवि कलम ३९२, ३४१, ५०४, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे घटनेचा तपास करीत आहेत.