साक्री रोडवरील गतिरोधकाने घेतला महिलेचा जीव, धुळ्याकडे येत असताना घडली घडना
By देवेंद्र पाठक | Updated: November 24, 2023 18:02 IST2023-11-24T18:01:37+5:302023-11-24T18:02:00+5:30
धुळ्यात प्रवेश केल्यानंतर साक्रीरोडवरील मोहन मेडीकल समोरुन जात असताना गतिरोधकाला आदळून त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

साक्री रोडवरील गतिरोधकाने घेतला महिलेचा जीव, धुळ्याकडे येत असताना घडली घडना
धुळे : शहरातील साक्रीरोडवरील गतिरोधकामुळे मोटारसायकलचा अपघात होऊन महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या गतिरोधकामुळे महिलेचा बळी गेल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी सरला शंकर ठाकूर (वय ६१) या आपल्या नातवासोबत धुळ्याकडे येत होत्या. त्यांना मुंबईला जाण्यासाठी रेल्वे पकडायची असल्याने त्या सकाळीसच साडेसहा वाजता नातवाच्या मोटारसायकलने येत होत्या. धुळ्यात प्रवेश केल्यानंतर साक्रीरोडवरील मोहन मेडीकल समोरुन जात असताना गतिरोधकाला आदळून त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.
सरला पाटील या दुचाकीवर मागे बसल्या असल्याने त्या अपघातावेळी दूर अंतरावर फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या. तर नातवाला सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. सरला ठाकूर यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनीही घटनास्थळी भेट देत पहाणी केली.
दरम्यान, सरला ठाकूर यांच्या मृत्यूमुळे कुसुंबा गावात शोककळा पसरली आहे.