शिंदखेडा तहसीलमधून वाळूचे ट्रॅक्टर पळविले
By अतुल जोशी | Updated: October 4, 2023 16:28 IST2023-10-04T16:27:44+5:302023-10-04T16:28:13+5:30
ट्रॅालीत एक ब्रास वाळूदेखील होती. ट्रॅालीसह ट्रॅक्टर तहसीलच्या आवारात लावून संरक्षक भिंतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते.

शिंदखेडा तहसीलमधून वाळूचे ट्रॅक्टर पळविले
धुळे - महसूल कर्मचाऱ्यांनी जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारातून चालकाने पळवून नेल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसांत ट्रॅक्टर चालकाविरुद्ध ३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदखेडा तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले होते.
ट्रॅालीत एक ब्रास वाळूदेखील होती. ट्रॅालीसह ट्रॅक्टर तहसीलच्या आवारात लावून संरक्षक भिंतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते. दरम्यान, चालकाने तहसीलच्या आवारात लावलेले पाच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर वाळूसह पळवून नेले. याप्रकरणी शिंदखेडा शहराचे मंडळाधिकारी रोहिदास कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक हेमकांत ठाकरे (वय २९, रा. कदाणे, ता. शिंदखेडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल पठाण करीत आहे.