बुलेटच्या धडकेत शेतमजूर ठार; बुलेटस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Updated: November 29, 2023 17:05 IST2023-11-29T17:03:08+5:302023-11-29T17:05:34+5:30
शेताकडे पायी जाणाऱ्या शेतमजुरास बुलेटस्वाराने मागून जोरात धडक दिली

बुलेटच्या धडकेत शेतमजूर ठार; बुलेटस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल
धुळे : शेताकडे पायी जाणाऱ्या शेतमजुरास बुलेटस्वाराने मागून जोरात धडक दिली. या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास बाभुळदे शिवारात निंबा पाटील यांच्या शेतासमोर घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात २८ रोजी बुलेटस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील पनाखेड येथील रहिवासी भीमसिंग भिकला पावरा (वय ३४) हे रोजगारानिमित्त बाभुळदे शिवारात राहतात. ते रात्रीच्या वेळी शेताकडे जात असताना मागून येणाऱ्या बुलेटस्वाराने (क्र. एमएच १८- बीवाय ५०१७) जोरदार धडक दिली. घटना घडल्यानंतर बुलेटस्वाराने पळ काढला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भीमसिंग पावरा याला शिरपूर येथील कॉटेज रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयताचा मुलगा सतीश पावरा याने शिरपूर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यावरून बुलेट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक कुटे करीत आहेत.