ऐचाळे शिवारातून ५० हजारांची कॉपर केबल लंपास

By देवेंद्र पाठक | Updated: April 23, 2023 18:53 IST2023-04-23T18:53:04+5:302023-04-23T18:53:15+5:30

ऐचाळे शिवारातून ५० हजारांची कॉपर केबल लंपास झाली. 

A copper cable worth 50,000 was lost from Aichale Shiwar | ऐचाळे शिवारातून ५० हजारांची कॉपर केबल लंपास

ऐचाळे शिवारातून ५० हजारांची कॉपर केबल लंपास

धुळे: साक्री तालुक्यातील ऐचाळे शिवारातून ५० हजार रुपये किमतीची कॉपर केबल लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. सिक्युरिटी मॅनेजर तुकाराम सुखदेव झावरे (वय ५२, रा. वाघोदा, ता. नंदुरबार) यांनी फिर्याद दाखल केली. 

त्यानुसार साक्री तालुक्यातील दुसाणे, पेटले, ऐचाळे शिवारात सुझलाॅनचा टॉवर आहे. या टॉवरवरून चोरट्याने कॉपर केबल लंपास केली. ४७ हजार ९२५ रुपये किमतीची ही केबर वेगवेगळ्या टॉवरवर होती. कोणीही नसल्याची संधी साधून चाेरट्याने ही कॉपर केबल लंपास केली. चोरीची ही घटना ८ मार्च २०२३ रोजी रात्री साडेअकरा ते १९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. सुरुवातीला ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. ही घटना लक्षात आली त्यावेळेस तुकाराम झावरे यांनी निजामपूर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भादंवि कलम ३७९, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिस हेड कॉन्स्टेबल मालचे घटनेचा तपास करीत आहेत.

 

Web Title: A copper cable worth 50,000 was lost from Aichale Shiwar