बसमध्ये विवाहित तरुणीचा विनयभंग, नंदुरबारच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 17:17 IST2023-04-26T17:17:22+5:302023-04-26T17:17:36+5:30
याप्रकरणी नंदुुरबारच्या एका संशयिताविरुद्ध शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसमध्ये विवाहित तरुणीचा विनयभंग, नंदुरबारच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
राजेंद्र शर्मा
शिरपूर : चोपडा-नवापूर बसमधून प्रवास करणाऱ्या एका २३ वर्षीय विवाहित तरुणीचा विनयभंग केल्याची घटना २५ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी नंदुुरबारच्या एका संशयिताविरुद्ध शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास चोपडा येथून २३ वर्षीय विवाहित तरुणी शिरपूर येथे येण्यासाठी चोपडा-नवापूर बसमध्ये (एमएच ४०-एन-९०४१) बसली़ बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती़ काही वेळानंतर बसमधील एक युवक गर्दीचा फायदा घेत तिला लज्जा वाटेल असे कृत्य करू लागला़ त्या तरुणीने त्यास वेळोवेळी सांगूनही तो तिला त्रास देत होता़ पुन्हा त्याने त्रास दिल्यामुळे ती तरुणी जोराने ओरडली़ तिने घडलेली घटना बसमधील अन्य प्रवाशी व चालकाला सांगितली़ त्यामुळे चालकाने बस शिरपूर आगारात न आणता सरळ शिरपूर पोलिस ठाण्यात नेली़ तेथे नेल्यावर संशयित आरोपी एहसान अहमद शेख सादीक (वय २५, रा. नंदुरबार) यास पोलिसांनी जेरबंद केले़
त्या तरुणीच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसात संशयित युवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करीत आहेत़