शहीद जवान भदाणेंच्या कुटुंबीयांना ९८ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 05:37 IST2018-06-18T05:37:58+5:302018-06-18T05:37:58+5:30

शहीद जवान योगेश भदाणे यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या आश्वासनानुसार ९८ लाख ८८ हजार रुपयांची मदत मिळवून दिली आहे.

 98 lakhs aid to the families of martyrs of Bhadran | शहीद जवान भदाणेंच्या कुटुंबीयांना ९८ लाखांची मदत

शहीद जवान भदाणेंच्या कुटुंबीयांना ९८ लाखांची मदत

धुळे : शहीद जवान योगेश भदाणे यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या आश्वासनानुसार ९८ लाख ८८ हजार रूपयांची मदत मिळवून दिली आहे. त्यामुळे आमदार अनिल गोटे यांचा खोटेपणा पुन्हा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी टीका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली. त्यांनी गोटे यांचा थेट नामोल्लेख करणे टाळले.
आमदार गोटे व डॉ. सुभाष भामरे यांच्यात गेल्या काही दिवसापासून पत्रकयुद्ध सुरू आहे. त्यातून एकमेकांवर जोरदार टीका टिपण्णी सुरू आहे.धुळ््याची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे व ते आपल्याला मान्य आहे़ मुख्यमंत्र्यांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे भामरे यांनी सांगितले.

Web Title:  98 lakhs aid to the families of martyrs of Bhadran