जिल्ह्यातील ९६. ७० टक्के रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 11:25 IST2021-02-04T11:24:51+5:302021-02-04T11:25:05+5:30
धुळे : जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९६.७० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. शिंदखेडा ...

जिल्ह्यातील ९६. ७० टक्के रुग्णांची कोरोनावर मात
धुळे : जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९६.७० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील बाधित रुग्णांपैकी ९७.३८ टक्के रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे. ०.६६ टक्के रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. मृत्यूदर मात्र दोन टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण बाधित रुग्णांपैकी २.६३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ८४७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर १४ हजार ३५८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ९८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनामुक्तीत शिंदखेड्याची आघाडी -
कोरोनामुक्त रुग्णांच्या प्रमाणात शिंदखेड्याने आघाडी घेतली आहे. शिंदखेडा तालुक्यातील ९७. ३८ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील १ हजार ८३७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी १ हजार ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. ४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
धुळे शहरात ५९ रुग्ण -
जिल्ह्यातील एकूण ९८ बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यापैकी ५९ रुग्ण हे धुळे शहरातील आहेत.
धुळे शहरात एकूण ७ हजार १२२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ६ हजार ८८९ रुग्ण बरे झाले असून १७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
साक्रीतील ९७ टक्के रुग्ण बरे -
साक्री तालुक्यातील ९७. ३० टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आढळलेल्या १ हजार ४११ रुग्णांपैकी १ हजार ३७३ रुग्ण बरे झाले आहेत. ३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्य झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा ७ बाधित रुग्ण आढळले आहेत.
धुळे तालुक्यात २० सक्रिय रुग्ण -
धुळे तालुक्याचे कोरोनामुक्तीचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. तालुक्यातील ९४.५८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात १ हजार ७३६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी १ हजार ६४२ रुग्ण बरे झाले आहेत. ७४ रुग्णांचा मृत्यू तर २० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
शिरपुरात ९ रुग्ण -
शिरपूर तालुक्यातील ९ बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. तालुक्यात एकूण २ हजार ७४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी २ हजार ६६५ बरे झाले आहेत. तालुक्याचे कोरोनामुक्तीचे प्रमाण ९७.२२ टक्के इतके आहे. ७६ बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्राकडून देण्यात आली आहे.