शिरपूर तालुक्यात ८८ मशीन सीलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST2021-01-13T05:33:49+5:302021-01-13T05:33:49+5:30

११ रोजी येथील तहसील कार्यालयात ८८ मतदानयंत्रे सील करण्यात आली. तालुक्यात २८ ग्रामपंचायतींच्या ८५ प्रभागांतून १९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ...

88 machines sealed in Shirpur taluka | शिरपूर तालुक्यात ८८ मशीन सीलबंद

शिरपूर तालुक्यात ८८ मशीन सीलबंद

११ रोजी येथील तहसील कार्यालयात ८८ मतदानयंत्रे सील करण्यात आली. तालुक्यात २८ ग्रामपंचायतींच्या ८५ प्रभागांतून १९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्याकरिता कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट यांची सेटिंग सीलिंग करण्यात आली. सेटिंग सिलिंगसाठी शिल्पनिर्देशक व त्यांना सहायक म्हणून तलाठी, कृषी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सेटिंग सीलिंग केली, या कार्यक्रमाला तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार गणेश आढारी, निवडणूक नायब तहसीलदार मायानंद भामरे, लिपिक नरेंद्र नाईक, ज्ञानेश येवला, प्रदीप परदेशी, गेंद्री गावीत, शुभांगी चव्हाण, जयेश धाकड यांनी काम पाहिले.

द्वितीय प्रशिक्षण

येथील तहसील कार्यालयात ११ रोजी सकाळ सत्रात द्वितीय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. तालुक्यात होत असलेल्या उर्वरित २८ ग्रामपंचायतींसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीनसह मतदान प्रक्रियेवर मार्गदर्शन करण्यात आले. तहसील कार्यालयात तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार गणेश आढारी, मायानंद भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तहसीलदार महाजन यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी ईव्हीएम मशीलबद्दलची सर्वकाही माहिती देऊन मॉक पोल कसा घ्यायचा, याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे ईव्हीएम सील करणे, मॉक पोल दाखवणे, यासाठी कशी काळजी घ्यावी, मतदारांची ओळख याबद्दल माहिती दिली. शिवाय आपल्या कर्तव्याचे पालन करून वेळेचे पालन करावे. निवडणुकीच्या कामांमध्ये अजिबात टाळाटाळ करू नये, काही अडचणी आल्यास वरिष्ठांशी संपर्क साधवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

१४ रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेमणुकीच्या मतदान केंद्रांबाबत माहिती देऊन साहित्याचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर नेमणुकीच्या ठिकाणी रवाना करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष सोबत ३ मतदान अधिकारी, शिपाई, पोलीस यांची नियुक्ती केली जाणार आहे.

१५ रोजी सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी १८ रोजी येथील तहसील कार्यालयात होणार आहे.

Web Title: 88 machines sealed in Shirpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.