बंधारा दुरुस्तीसाठी ८६ लाख मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:53+5:302021-04-06T04:34:53+5:30
येथे पांझरेवर २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा क्षतिग्रस्त झाल्याने त्यात सध्या पाणीसाठा होत नाही. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीची ...

बंधारा दुरुस्तीसाठी ८६ लाख मंजूर
येथे पांझरेवर २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा क्षतिग्रस्त झाल्याने त्यात सध्या पाणीसाठा होत नाही. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी होती. कौठळचे माजी सरपंच कीर्तिमंतराव कवठळकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला, परिणामी राज्य शासनातर्फे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ८६ लाखांच्या कामास मंजुरी देण्यात आली. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीनंतर तब्बल अकराशे सहस्र घनमीटर पाणीसाठा अडविला जाणार असून १०० हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित होणार आहे. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम होणार आहे. या बंधारा दुरुस्तीमुळे कौठळ परिसरात मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
या बंधारा दुरुस्तीचा फायदा कौठळ परिसरासह तामसवाडी, हेंकळवाडी, न्याहळोद, मोहाडी आदी गावांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.