दोंडाईचा येथील ८५ अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 21:44 IST2020-08-24T21:42:46+5:302020-08-24T21:44:36+5:30
२६५ अहवाल पॉझिटिव्ह़, तीन मृत्यू

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील आणखी २६५ अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये, धुळे शहरातील अभय रोड परिसरातील राम नगर येथील दोन व साक्री रोड परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान,दोंडाईचा येथील तब्बल ८५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोमवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ४८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील २४, शिंदखेडा तालुक्यातील १३४, शिरपूर तालुक्यातील ३७ व साक्री तालुक्यातील २२ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ३०६ इतकी झाली आहे.