जिल्ह्यातील ८० शाळांची होणार चुलीच्या धुरातून मुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:57+5:302021-04-02T04:37:57+5:30
जिल्ह्यातच नाहीतर राज्यभरातील शाळांमध्ये गॅस कनेक्शनची परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सारखी आहे़ त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या शाळांना गॅस सिलिंडर दिले तर ...

जिल्ह्यातील ८० शाळांची होणार चुलीच्या धुरातून मुक्ती
जिल्ह्यातच नाहीतर राज्यभरातील शाळांमध्ये गॅस कनेक्शनची परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सारखी आहे़ त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या शाळांना गॅस सिलिंडर दिले तर या शाळांची चुलीच्या धुरातून मुक्तता होईल. त्यामुळे अशी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात १ हजार ६८६ इतक्या शाळांपैकी धुळे, साक्री आणि शिरपूर तालुक्यातील सर्वच प्राथमिक शाळांमध्ये गॅसचे कनेक्शन लावण्यात आले आहे. शिंदखेडा तालुक्यातील केवळ ८० शाळांना गॅसचे कनेक्शन लावणे बाकी आहे. शिंदखेडा तालुक्यातील ज्या शाळांना गॅस कनेक्शन नाही अशांना ते उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तशी माहितीदेखील मागविण्यात आली आहे. अजून त्यासाठी निधी उपलब्ध झाला नसला तरीही जर ही सोय झाली तर शालेय पोषण आहार शिजवून देणे सुकर होणार आहे़
कोटसाठी
शिंदखेडा तालुक्यातील ८० शाळा सोडल्यास जिल्ह्यातील उर्वरित सर्वच शाळांमध्ये गॅस कनेक्शन आहे. त्या माध्यमातून अन्न शिजवून मुलांना वाटप होते. ८० शाळांसाठीच्या गॅस कनेक्शनसंदर्भातील प्रस्ताव हा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे़
- मनीष पवार
प्राथमिक शिक्षणाधिकारी, धुळे
(अशी आहे आकडेवारी)
जिल्ह्यातील एकूण शाळा १६८६
गॅस नसलेल्या शाळा ८०
गॅस नसलेल्या तालुकानिहाय शाळा
धुळे - ००
साक्री - ००
शिरपूर - ००
शिंदखेडा - ८०