पाणीटंचाईमुळे ८ वीटभट्टी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:19 IST2019-05-14T22:18:39+5:302019-05-14T22:19:28+5:30

कापडणे परिसर : मजुरीत वाढ, मजुरांची टंचाई, कोळसा महागला, संकटांची मालिका

8 barbecue closure due to water scarcity | पाणीटंचाईमुळे ८ वीटभट्टी बंद

पाणीटंचाईमुळे ८ वीटभट्टी बंद

कापडणे : कापडणेसह परिसरात ८ ते १० वीटभट्टी व्यवसाय सुरू होते. मात्र, पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट असल्यामुळे वीटभट्टी व्यवसायाला घरघर लागली आहे. यामुळे तब्बल ८ वीटभट्टी बंद पडल्या आहेत. पाणीटंचाईसोबतच वाढती मजुरी, मजूर टंचाई, कोळसा महागला, मातीची टंचाई अशा संकटांना तोंड द्यावे लागत असल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत.
कापडणे परिसराचा गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विटा तयार करण्यामध्ये नावलौकिक होता. मात्र, प्रत्येकवर्षी एक-दोन करीत वीट भट्टी धारकांचे विटा थापण्याचे व तयार करण्याचे पदावे कायमस्वरूपी बंद पडत आहेत. सध्या येथे इंदिरानगरमधील रहिवासी हेमंत जयवंत चौधरी, पंडित दगा माळी, शालिक महादू मालचे असे तीनच विटांचे पदावे सुरू आहेत. पैकी हेमंत चौधरी यांचाही वीट पदावा बंद पडण्याच्या मार्गावर आहे तर पूर्वीपासून विटा तयार करून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय करणारे गोविंद नारायण मगर, गोविंद महाराज, मनोहर सुखदेव माळी, दत्तात्रय सुखदेव माळी, मंडाबाई शिवराम माळी, बारकू दामू पाटील, राजू पाटील, अण्णा जगदाळे, रामभाऊ सुकलाल चौधरी, मुरलीधर बडगुजर, दगडू रुस्तम पिंजारी आदी वीट भट्टी धारकांचे व्यवसाय कायमस्वरूपी बंद पडलेले आहेत.
मजूर टंचाई- मातीपासून विटा तयार करण्यासाठी या अवजड व श्रमाच्या कामासाठी सहजासहजी मजूर मिळत नाही, मिळाले तर त्यांना अधिक मजुरी द्यावी लागते व ४० हजार रुपये उचलही द्यावी लागत असते. कायमस्वरूपी विटा तयार करणाऱ्या कारागिरांना ऊसतोडणीचे वेध लागतात. कारण तेथे त्यांना पन्नास ते साठ हजार रुपये अधिक उचल मिळत असते म्हणून विटा तयार करणारे कारागीर ऊस तोडणीसाठी जात आहेत. परिणामी विटा तयार करणाºया कारागिरांअभावी वीटभट्टी व्यवसाय ओस पडत चालला आहे.
माती टंचाई- पूर्वी सोनवद धरणातून भरपूर माती मिळायची, त्या तुलनेने आता विना चुनखडीची, लाल- तांबडी, चिकट, भस्सर मुरूमची व नदीचा गाळ असलेली माती उपलब्ध होत नाही. धरणातून माती उचलण्यासाठी पूर्वी पंधराशे रुपयाची रॉयल्टी देऊन सलग रात्रंदिवस तीन दिवस ट्रॅक्टरने माती वाहतूक करता येत होती. मात्र, आता तसे राहिलेले नाही. विटा तयार करण्यासाठी गुणवत्तापूर्ण माती आता उपलब्ध होत नाही.
महागडा कोळसा- डोंगरगाव धरणातील जड मातीपासून तयार करण्यात येणाºया कच्च्या विटांना लाकडांपासून भाजण्यासाठी अडचण येते, त्यामुळे ९ हजार रुपये टन दराच्या महागड्या कोळशापासून विटा भाजाव्या लागतात. तर कापडणे व्यतिरिक्त अन्य गावात मातीपासून विटा बनवल्या जातात. मात्र, त्या विटा लाकूड, शेणाच्या गोवºया, कपाशीच्या काड्या आदीपासून भाजल्या जातात. म्हणून बाहेरगावच्या १०० विटा कापडणे येथे वाहतुकीसह चारशे रुपये इतक्या कमी भावात विकल्या जात आहेत. त्या तुलनेने कापडणे येथील विटा या भावात विक्री करण्यास परवडत नाही, असे कापडणे येथील वीट तयार करणाºया व्यवसायिकांचे म्हणणे आहे.
पाणीटंचाई- सततच्या दुष्काळामुळे कमालीची पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे शेतीला पाणी नाही, माणसांसह गुरांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे विटा तयार करण्यासाठी पाणी कसे मिळणार, हा प्रश्नच आहे. पाण्याअभावी विटा तयार करण्याचे काम रखडले आहे.
बेमोसमी पाऊस- वादळ वाºयासह अवकाळी पावसामुळे मातीपासून तयार करण्यात आलेल्या कच्च्या विटांचे पूर्णत: नुकसान होते. कच्चा माल भट्टीत रचलेला असताना अवकाळी पावसामुळे पाण्यात विरघळून संपूर्ण खराब होत असतो.
वाढती मजुरी- एक हजार वीट बनविण्यासाठी मजुराला सहाशे रुपये द्यावे लागतात, एक हजार कच्च्या विटा भाजण्यासाठी भट्टीपर्यंत वाहून नेण्यासाठी दोनशे रुपये मजुरी लागते, एक वीट भट्टी रचण्यासाठी दहा हजार रुपये मजुरी द्यावी लागते, सर्व खर्च लक्षात घेता प्रत्येक तयार वीट चार रुपये नगाप्रमाणे विक्री करणे वीटभट्टी धारकांना परवडत नसल्याने दरवर्षी वीटभट्टी व्यवसाय बंद पडत आहेत.

Web Title: 8 barbecue closure due to water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे