७६६ ‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’चा मेसेज तुम्हाला पश्चाााप आणू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST2021-06-02T04:27:00+5:302021-06-02T04:27:00+5:30

सायबर गुन्हेगारीचे नवनवे प्रकार पुढे येत आहेत. आधी लॉटरी लागल्याचे आणि नोकरीचे आमिष दाखविणारे फोन करून सायबर गुन्हेगार संबंधित ...

766 The message of 'Seam Verification Pending' may make you regret it | ७६६ ‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’चा मेसेज तुम्हाला पश्चाााप आणू शकतो

७६६ ‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’चा मेसेज तुम्हाला पश्चाााप आणू शकतो

सायबर गुन्हेगारीचे नवनवे प्रकार पुढे येत आहेत. आधी लॉटरी लागल्याचे आणि नोकरीचे आमिष दाखविणारे फोन करून सायबर गुन्हेगार संबंधित व्यक्तीची फसवणूक करायचे. अलीकडे सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्यासाठी नवनवीन शक्कल लढविणे सुरू केले आहे. कधी बँकेच्या नावावर, कधी मोबाइल कंपन्यांच्या नावावर, तर कधी कोणत्या नावावर ते फोन करतात आणि बेमालूमपणे समोरच्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक करीत असल्याचा प्रकार हल्ली मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

मोबाइलवरून फसवणूक झाल्याच्या तक्रारी

सायबर गुन्हेगाराने मोबाइलवरून फोन करून फसविल्याचे प्रकार नागपूर शहरात नियमित घडत आहेत. २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांच्या कार्यकाळात सायबर गुन्हेगारीच्या सुमारे दहा हजार तक्रारी आल्या. त्यातील सुमारे दोन हजार तक्रारी मोबाइलवरून फसविल्याच्या आहेत.

अशी घ्या काळजी

कोणत्याही अनोळखी व्यक्तीने कसलेही आमिष अथवा भीती दाखविली, तर त्याला भीक घालू नका. कोणत्याच प्रकारची लिंक अथवा ॲप डाऊनलोड करू नका.

Web Title: 766 The message of 'Seam Verification Pending' may make you regret it