धुळ्य़ात मारहाण करुन 70 हजार लुटले

By Admin | Updated: July 17, 2017 13:01 IST2017-07-17T13:01:46+5:302017-07-17T13:01:46+5:30

याप्रकरणी शहर पोलिसात 16 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

70,000 looted by rioting | धुळ्य़ात मारहाण करुन 70 हजार लुटले

धुळ्य़ात मारहाण करुन 70 हजार लुटले

लाईन लोकमतधुळे, दि. 17 - गाडीचा कट मारला म्हणून एकास मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण करणा:या संशयितांनी त्याच्याजवळची 70 हजाराची रोकडही लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी शहर पोलिसात 16 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.गाडीचा कट मारला म्हणून हिरालाल शिवराम वाघ (43) यांना शनिवारी सायंकाळी सुरत बायपासवर एका हॉटेलवर एका जमावाने मारहाण केली आणि त्याच्याजवळचे 70 हजार रुपये रोख लुटून नेले. जखमी हिरालाल वाघ यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आह़े याप्रकरणी त्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी जखमी हिरालाल वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित राजेश ईश्वर पवार, प्रविण ईश्वर पवार, विठ्ठल पंढरीनाथ गावडे, देविदास पंढरीनाथ गावडे, संदिप एकनाथ गावडे, राहुल विठ्ठल गावडे, विक्की बारकू गावडे, भूषण ज्ञानेश्वर पाटील, योगेश उचाळे, संदिप पांडूरंग उचाळे, श्याम पंढरीनाथ गावडे, राकेश उचाळे, सुमीत गावडे, स्नेहल पवार, प्रदीप रमेश गावडे, शुभम ज्ञानेश्वर गावडे आणि अन्य 4 ते 5 जणांवर भादंवि कलम 395, 143, 147, 148, 149, 336, 323, 504, 506, 427 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आह़े

Web Title: 70,000 looted by rioting