७ अहवाल निगेटीव्ह, दुसऱ्या दिवशीही दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 11:37 IST2020-04-28T11:26:33+5:302020-04-28T11:37:03+5:30

आतापर्यंत ६८३ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत

7 report negative, relief the next day | ७ अहवाल निगेटीव्ह, दुसऱ्या दिवशीही दिलासा

Dhule


७ अहवाल निगेटीव्ह, दुसऱ्या दिवशीही दिलासा
धुळे- येथील हिरे रूग्णालयातील प्रयोगशाळेत मंगळवारी सकाळी ७ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सोमवारी २९ अहवाल निगेटीव्ह आले होते. शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील व्यक्ती तसेच हिरे महाविद्यालयाच्या काही डॉक्टरांचा यात समावेश होता. सलग दुसऱ्या दिवशी रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत ६८३ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत तर २४ रूग्ण कोरोना पॉजीटीव्ह आढळले आहेत. तर कोरोनामुळे जिल्ह्यातील चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 7 report negative, relief the next day

टॅग्स :Dhuleधुळे