7 लाखांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त
By Admin | Updated: April 4, 2017 01:18 IST2017-04-04T01:18:51+5:302017-04-04T01:18:51+5:30
नेर येथे अपर पोलीस अधीक्षकांची कारवाई : हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

7 लाखांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त
धुळे : तालुक्यातील नेर येथील हॉटेल शुभमच्या गोदामावर रविवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी जप्त केलेला बेकायदेशीर दारूसाठा 7 लाख 6 हजारांचा असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका:यांनी सीलबंद केलेल्या मालाव्यतिरिक्त हा साठा मिळून आला आह़े याप्रकरणी हॉटेल मालक तुषार जयस्वालला अटक केली आह़े
धुळे तालुक्यातील नेर गावातील म्हसदी रोडलगत असलेल्या शुभम बिअर बार व परमिट रूम हॉटेलच्या बाजूला तळघरात तुषार जयस्वाल हा विनापरवाना देशी-विदेशी दारू व बिअरचा साठा जवळ बाळगून त्याची चोरटी विक्री करीत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली़ त्यानुसार त्यांनी त्यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक भास्कर शिंदे यांना कारवाईचे आदेश दिल़े शिंदे यांच्या पथकाने 2 मार्च रोजी रात्री शुभम हॉटेलवर छापा टाकला़ हॉटेलच्या गोदामातून दारूसाठा जप्त करण्यात आला.रात्री उशिरार्पयत तपासणी पूर्ण झाल्यानंतर दारूसाठय़ाची किंमत 7 लाख 6 हजार 407 रुपये असल्याचे स्पष्ट झाल़े संशयित तुषार भटूलाल जयस्वाल (वय 30, रा़ नेर) यास अटक करण्यात आली आहे.
या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक भामरे यांनी सीलबंद केलेल्या मालाव्यतिरिक्त वरील दारूसाठा हॉटेलच्या बाजूला असलेल्या तळघरात गोडाऊनमध्ये विनापरवाना, बेकायदेशीरीत्या मिळून आला़ पोलिसांनी तुषार जयस्वाल याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आह़े ही कारवाई पथकातील प्रदीप सोनवणे, पो़नि. बिपीन पाटील, पो़कॉ. मुकेश जाधव यांनी केली़