७ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:07 PM2019-03-25T23:07:13+5:302019-03-25T23:07:59+5:30

शिरपूर तालुका : गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

7 Gram Panchayats results | ७ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

dhule

Next

शिरपूर : तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी तहसिल कार्यालयाच्या बाहेर गुलाल उधळत जल्लोष केला़
जैतपूर- सरपंचपदी भोजेसिंग अमृत राजपूत तर सदस्यपदी प्रकाश वसंत भिल, सुभाबाई भाईदास भिल, संगीता पितांबर घोडसे, विजयसिंग भीमसिंग राजपूत हे निवडून आले तर तुळशीराम कल्याणसिंग परदेशी, ज्योतीबाई पंडित राजपूत, अर्चनाबाई दिलीपसिंह परदेशी हे बिनविरोध निवडून आले होते.
नवे भामपूर- सरपंचपदी मोहन रामचंद्र पाटील तर सदस्यपदी रवींद्र मन्साराम भिल, उजनबाई साहेबराव पवार, आशा तुकाराम दोरिक, सुरेखा हंसराज पाटील, अमृत हरकलाल महाजन तर रामदास धनगर व निर्मलाबाई प्रल्हाद कोळी हे बिनविरोध निवडून आले होते.
सुभाषनगर- सरपंचपदी विजय अर्जुन पारधी तर सदस्यपदी प्रशांत रतिलाल वाल्हे, केशव गुलामगौस शेख, शगिराबानो जाशीद शेख, रामप्रसाद सुकलाल दाभाडे, जाईबाई गोकुळ पारधी, वैशाली विनोद कोळी, चैत्राम दयाराम साळुंखे, रेखा गोरख पारधी, रमणबाई सुकलाल पारधी निवडून आले.
भरवाडे- सरपंचपदी भारतीबाई दिलीप पटेल तर सदस्यपदी न्हानू पुना भिल, कलाबाई देविदास भिल, सखुबाई सुरेश कोळी, अविनाश मोहन पटेल, सुरेश रघुनाथ पटेल, सुनिता ब्रिजलाल भिल, संतोष भिमराव नगराळे, योगिता विनोद पटेल, अनिता संजय पटेल निवडून आले.
टेंभे बु़- सरपंचपदी दिलकोरबाई देवीसिंग राजपूत तर सदस्यपदी सुरेश वगर कढरे, सुनंदाबाई राजेंद्र भिल, रेखाबाई पुंडलिक राजपूत, संदीप देविदास भिल, सुमनबाई बुधा कोळी, रेखाबाई जयसिंग राजपूत हे सहा सदस्य बिनविरोध निवडून आले होते. येथे सरपंच व सहा सदस्य बिनविरोध निवडून आले होते. फक्त एका सदस्य पदासाठी निवडणूक झाली त्यात सखाराम रतन कोळी निवडून आले.
आढे- येथे सदस्यपदी सर्व सात सदस्य बिनविरोध निवडून आले होते़ येथे फक्त सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात मनोहर शांतीलाल पारधी हे सरपंचपदी निवडून आले तर बिनविरोध निवडून आलेले सदस्य असे सुनील सोनू शिरसाठ, राजश्री निलेश चव्हाण, योगेश भीमराव पाटील, कविता सुनील पावरा, देवसिंग ताराचंद भील, शोभाबाई संजय भिल, गिताबाई एकनाथ भिल यांचा समावेश आहे़
अजंदे खु.- ग्रामपंचायतीत सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले होते़ येथेही फक्त सरपंच पदासाठी निवडणूक झाली़ त्यात राजेंद्र उत्तम पाटील हे सरपंचपदी निवडून आले. तर सदस्यपदी ज्ञानेश्वर लोटन माळी, मालुबाई हिलाल वानखेडे, लताबाई राजेंद्र पाटील, शांतीलाल पुना कोळी, मनोज साहेबराव पवार, शोभाबाई अशोक मोरे, प्रतिभा सुभाष पाटील हे बिनविरोध निवडून आले होते.

Web Title: 7 Gram Panchayats results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे