धुळ्यातील कबीरगंज भागातून ७ गुरे पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 12:12 IST2018-10-14T11:58:50+5:302018-10-14T12:12:59+5:30
६९ हजार किंमत : एका संशयिताला घेतले ताब्यात

धुळ्यातील कबीरगंज भागातून ७ गुरे पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील कबीरगंज भागात बांधून ठेवलेल्या ७ गुरांची सुटका करण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले़ त्याची किंमत ६९ हजार इतकी असून याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले़ ही कारवाई रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास झाली़
शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आणि चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चवरे यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली़ चाळीसगाव रोडवरील कबीरगंज भागातील सत्तार शहा यांच्या वाड्याजवळ ७ गुरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवली असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने पहाटे ५ वाजेच्या सुमारास धाड टाकली़ गुरांची सुटका केली़ ही गुरे ६९ हजार रुपयांची आहेत़ याप्रकरणी शेख रशीद शेख शेरु (२८) याला पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतले आहे़