मार्च महिन्यात झाल्या ५४ हजार कोरोना चाचण्या, पॉझिटिव्हिटी १८ टक्क्यांवर; कोरोनामुक्तीचा दर मात्र घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST2021-04-04T04:37:17+5:302021-04-04T04:37:17+5:30
एकूण ५४ हजार ५१३ चाचण्यांमध्ये ३१ हजार ५८ रॅपिड चाचण्यांचा, तर २३ हजार ४५५ आरटीपीसीआर चाचण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ...

मार्च महिन्यात झाल्या ५४ हजार कोरोना चाचण्या, पॉझिटिव्हिटी १८ टक्क्यांवर; कोरोनामुक्तीचा दर मात्र घसरला
एकूण ५४ हजार ५१३ चाचण्यांमध्ये ३१ हजार ५८ रॅपिड चाचण्यांचा, तर २३ हजार ४५५ आरटीपीसीआर चाचण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज ५०० पेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. आतापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्या मार्च महिन्यात झाल्या आहेत. मात्र, दैनंदिन बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने योग्य कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होऊन अधिक चाचण्या होणे आवश्यक आहे. सध्या एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सहा व्यक्तींची चाचणी केली जात आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील किमान २० व्यक्तींच्या चाचण्या होणे आवश्यक आहे.
जानेवारीत झाल्या १२ हजार चाचण्या -
जानेवारी महिन्यात १२ हजार २१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ ३७० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जानेवारी महिन्यातील पॉझिटिव्हिटी दर केवळ ३.८ टक्के इतका होता. या महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती. चारही तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली होती. तसेच कोरोनामुक्तीचा दर ११८ टक्के इतका होता.
फेब्रुवारीतील पॉझिटिव्हिटी दर ८ टक्के -
फेब्रुवारी महिन्यात १० हजार ४९९ चाचण्या केल्या गेल्या. त्यापैकी ९२९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या महिन्यातील पॉझिटिव्हिटी दर ८.८५ टक्के इतका होता, तर कोरोनामुक्ती दर ९१ टक्के होता. मार्च महिन्यात मात्र बाधितांची संख्या वाढल्याने सर्वाधिक ५४ हजार चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हिटी दर वाढला तसेच कोरोनामुक्तीचा दर ८१ टक्क्यांवर घसरला आहे.
प्रतिक्रिया -
चाचण्यांची संख्या वाढल्याने पॉझिटिव्हिटी दर वाढला आहे. सुपर स्प्रेडर्सची तपासणी होत असल्याने बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. बाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्यासाठी किमान १४ दिवस लागतात. त्यामुळे या महिन्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढेल.
- डॉ. विशाल पाटील, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी
ग्राफसाठी -
जानेवारी -
चाचण्या - १२०२१
पॉझिटिव्ह रुग्ण - ३७०
पॉझिटिव्हिटी दर - ३. ८ टक्के
कोरोनामुक्त दर - ११८ टक्के
फेब्रुवारी
चाचण्या - १०४९९
पॉझिटिव्ह रुग्ण - ९२९
पॉझिटिव्हिटी दर - ८.८५ टक्के
कोरोनामुक्त दर - ९१ टक्के
मार्च
चाचण्या - ५४, ५१३
पॉझिटिव्ह रुग्ण - १०१९६
पॉझिटिव्हिटी दर - १८ टक्के
कोरोनामुक्त दर - ८१ टक्के