धुळे जिल्हा परिषदेतील ५२ कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 11:42 IST2019-06-04T11:40:54+5:302019-06-04T11:42:29+5:30

सीईओंनी केले कर्मचाऱ्यांचे समुपदेशन

 52 employees of Dhule District Council | धुळे जिल्हा परिषदेतील ५२ कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या

धुळे जिल्हा परिषदेतील ५२ कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत बदली प्रक्रिया सुरूसोमवारी ५२ कर्मचाºयांचे केले समुपदेशनबदलीपात्र कर्मचाºयांची जि.प.त गर्दी


आॅनलाइन लोकमत
धुळे :जिल्हा परिषदेतील वर्ग ३ कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून, सोमवारी बांधकाम, लघुसिंचन व सामान्य प्रशासन, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बालल्याण विभागातील बदलीपात्र कर्मचाºयांचे समुपदेशन करण्यात आले. यापैकी सायंकाळपर्यंत सामान्य प्रशासन तसेच महिला व बालकल्याण विभागातील ३५ कर्मचाºयांच्या प्रशासकीय व १७ कर्मचाºयांच्या विनंती अशा एकूण ५२ कर्मचाºयांच्या बदल्या झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हे समुपदेशन करण्यात येत आहे. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल उपस्थित होते.
जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ या कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया मे महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत पार पडणे अपेक्षित होते. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने, नियोजित वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया राबविता आलेली नाही. यासंदर्भात प्रशासनाने २७ मे रोजी परिपत्रक काढल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांची प्रकिया १ जून पासून पुन्हा सुरू झालेली आहे.
सोमवारी लघुसिंचन विभाग, बांधकाम व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाºयांचे समुपदेशन करण्यात आले. यात एका मोठ्या पडद्यावर बदलीपात्र कर्मचाºयांना रिक्त असलेल्या जागा दाखविण्यात आल्या. सोयीस्कर असलेल्या जागेवर कर्मचाºयांनी होकार देताच त्यांचे नाव त्या-त्या गावासाठी अंतिम करण्यात आले.
यात सामान्य प्रशासन विभागातील २६ प्रशासकीय व १५ कर्मचाºयांच्या विनंती बदल्या झाल्या. यात सहायक प्रशासन अधिकारी २, कनिष्ठ प्रशासन अधिकारी २, विस्तार अधिकारी (सांखिकी) १, वरिष्ठ सहायक (मंत्रालयीन) १२, कनिष्ठ सहायक (मंत्रालयीन) २४ अशा एकूण ४१ कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या. तर महिला व बालकल्याण विभागातील ७ कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या असून, यात पाच प्रशासकीय व दोन विनंती बदल्यांचा समावेश आहे. दरम्यान इतर विभागाची आकडेवारी उपलब्ध झालेली नव्हती.

 

Web Title:  52 employees of Dhule District Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे