५०० फुटाच्या टयूबवेलसुद्धा आटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:44 IST2019-05-11T22:42:37+5:302019-05-11T22:44:12+5:30
विहिरींमध्ये नावालासुध्दा पाणी शिल्लक

dhule
योगेश हिरे ।
म्हसदी : साक्री तालुक्यातील म्हसदी परिसर व लगतच्या गावांमध्ये पाणी पातळीने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला होता़ ५०० फुटापर्यंतच्या टयूबवेलनेही तळ गाठले. आता मे महिन्यात विहिरींमध्ये नावालासुध्दा पाणी शिल्लक नसल्याने पाणी टंचाईची भिषण स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़.
गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत आहे़. या ठिकाणी असलेल्या कुपनलिका तसेच विहिरींमधील पाणीपातळी कमालीची घटली आहे़. या भागात बहुसंख्य ट्युबवेल ३०० ते ५०० फुटापर्यंत आहेत़ परंतु दोन महिन्यापासून त्याही आटल्या असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले़ अद्याप मे महिना काढायचा असताना आतापासूनच पाण्याची वानवा निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे़
पिकांना पाणी देण्याची चिंता
पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने येथील शेतकºयांनी जे काही खरीपाची थोडीफार पिक घेतली आहेत, त्यांना पाणी देण्यासाठी शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे़. या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने पाण्याअभावी पिक करपू लागली असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़
सधन शेतकºयांकडून ठिबकच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्यात येत आहे़. परंतु इतर शेतकºयांसमोर मात्र समस्या निर्माण झालेली आहे़ मागील वर्षी ऐन पावसाळ्यातदेखील येथील पाण्याची पातळी खालावली होती़ त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते़ परंतु दिवसेंदिवस या समस्येत अधिक वाढ होत आहे़. त्यामुळे पिके जगवावी कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे़.
पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याने गावातील शेत मजुरांना आपली रोजंदारीदेखील बुडवावी लागत आहे़. अशी स्थिती असताना निदान जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन पाणी टंचाईचा उदभवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आहे़
परिसरात सिंचन योजना कार्यान्वित करुन येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात येत आहे़.
सध्या पाण्याचे सर्व स्रोत आटून गेलेले आहेत त्यामुळे गावाला पाणी पुरवठा वेळेवर व मुबलक प्रमाणावर करायला अडचण येत आहे.
दीपक जैन
सरपंच, म्हसदी
पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना आवश्यक आहे.
भरत नेरे
माजी सरपंच, वसमार
शेतांमध्ये सध्या तूर शेवगा पिके आहेत दोघे पिके ठिबकवर लागवड केलेली आहेत मात्र विहिरीने तळ गाठल्यामुळे फक्त 10ते 15 मिनिटेच पाणी पिकाला मिळते पाणी टंचाई व तापमानामुळे पिके करपत आहे. मे महिना व जून महिन्या मध्यावधीपर्यंत पिके कसे जगवायचे या चिंतेत आहे.
ज्ञानेश्वर अहिरे
शेतकरी, वसमार