तलवार बाळगणाऱ्या ५० वर्षीय इसमास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:23 IST2019-04-10T16:22:40+5:302019-04-10T16:23:46+5:30
तलवार घेतली ताब्यात, गुन्हा दाखल

तलवार बाळगणाऱ्या ५० वर्षीय इसमास अटक
ठळक मुद्दे५०० रूपये किंमतीची लोखंडी तलवार जप्त गोविंदा वाणी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली
आॅनलाइन लोकमत
धुळे : नगावबारी परिसरात तलवार बाळगणाऱ्यास ५० वर्षिय इसमास पश्चिम देवपूर पोलिसांनी १० रोजी रात्री अटक केली आहे.
नगावबारी परिसरातील सैनिक कॉलनीच्या पाठीमागे राहणाºया कोविंदा काशिनाथ वाणी (वय ५०, ) हा ९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तलवार बाळगतांना आढळून आला. त्याच्याजवळून ५०० रूपये किंमतीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस नाईक किरण मगन कोठावदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला गोविंदा वाणी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक एस.पी.तिगाटे करीत आहेत.