महापालिकेत मंगळवारी महिला व बालकल्याण समितीची सभा झाली. त्या वेळी हा निर्णय झाला. सभेला सभापती वंदना थोरात यांच्यासह समितीच्या सदस्य उपस्थित होत्या. महिला व बालकल्याण समितीसाठी १ कोटी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून सभेत विविध कामांसाठी तरतुदी सुचवल्या. शहरात प्रसूतिगृह बांधण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यास मंजुरी दिली. प्रसूतिगृहासाठी जागा सुचवण्याची जबाबदारी महापालिका अभियंता व नगररचनाकारांवर सोपवण्यात आली. प्रसूतिगृह स्वामिनारायण मंदिर, हमाल मापाडी परिसरात करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर गरजू महिलांना शिवणयंत्र वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले. उपलब्ध निधीनुसार मशीन वाटपाचा निर्णय होणार आहे. पुढील आर्थिक वर्षात अंदाजपत्रकानुसार निधी प्राप्त झाल्यावर महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. त्याचप्रमाणे महिलांसाठी सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. सभागृहासाठी अभियंता व नगररचना विभागाला जागा निश्चित करावी अशी सूचना सभापती थोरात यांनी दिली.
प्रसूतिगृह बांधण्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:36 IST