४७ लाखांचा घोटाळा अन् ३३ वर्षांनी निकाल, लघुसिंचन अपहारात भास्कर वाघ व वसावे दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 06:33 AM2024-03-31T06:33:32+5:302024-03-31T06:34:07+5:30

Dhule scam News: सुमारे ३३ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागात बनावट धनादेशांद्वारे ४७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी २६ जणांविरुद्ध गुन्हा झाला भास्कर दाखल होता.

47 lakhs scam and result after 33 years, Bhaskar Wagh and Vasave guilty in micro-irrigation embezzlement | ४७ लाखांचा घोटाळा अन् ३३ वर्षांनी निकाल, लघुसिंचन अपहारात भास्कर वाघ व वसावे दोषी

४७ लाखांचा घोटाळा अन् ३३ वर्षांनी निकाल, लघुसिंचन अपहारात भास्कर वाघ व वसावे दोषी

धुळे - सुमारे ३३ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागात बनावट धनादेशांद्वारे ४७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी २६ जणांविरुद्ध गुन्हा झाला भास्कर दाखल होता. वाघ भास्कर वाघ आणि सखाराम वसावे या दोघांना विविध कलमांन्वये विशेष न्यायाधीश एफ. ए. एम. ख्वॉजा यांनी दोषी ठरवत शिक्षा दिली. वाघ हा १९९४ पासून येरवडा कारागृहात आहे.

३० डिसेंबर १९८८ ते २५ सप्टेंबर १९८९ या कालावधीत अपहार झाला. एकूण २६ जणांविरुद्ध खटला दाखल झाला होता. पैकी १७ संशयित मृत झाले असून, नऊ जण हयात आहेत. नऊपैकी भास्कर वाघ आणि सखाराम वसावे यांना शिक्षा झाली असून, सबळ पुराव्यांअभावी जगन्नाथ पवार, अशोक पवार, गुलफाम शेख, रामदास रामजादे, कृष्णलाल शहा, शिवकुमार जोशी व रामचंद्र महाले यांची निर्दोष मुक्तता झाली, अशी माहिती विशेष सरकारी वकील संभाजीराव देवकर यांनी दिली.

वाघ १९९४ पासून तुरुंगातच..!
भास्कर वाघ याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. यापैकी दहा खटल्यांचा निकाल लागला आहे, तर उर्वरित खटले न्यायप्रविष्ठ आहेत. वाघ हे सन १९९४ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असून, त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये झालेली आहे. त्यांना १० खटल्यांमध्ये एकत्रित १३० वर्षांची शिक्षा झालेली आहे.

विविध कलमांखाली दाखल होते गुन्हे
गुन्हा सिद्ध झाल्याने भादवि कलम १२० ब नुसार ४ वर्षे सक्तमजुरी, पाच हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद, भादंवि ४०९ अन्यये सात वर्षे सक्तमजुरी, एक लाख रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधी केंद. भादंवि ४६७ नुसार ७ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, केवळ भास्कर वाघ याच्यावर ४७१ अ नुसार गुन्हा सिद्ध झाल्याने ५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, तर १३-१-ड आणि १३-२ अन्वये सात वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

Web Title: 47 lakhs scam and result after 33 years, Bhaskar Wagh and Vasave guilty in micro-irrigation embezzlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.