शेतकरी अपघात विमा योजनेचेे ४१ प्रस्ताव आठ महिन्यांपासून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST2021-08-29T04:34:28+5:302021-08-29T04:34:28+5:30

. नवीन याेजना सुरू हाेऊन चार महिने झाले तरी अद्यापही नवीन विमा कंपनीची नियुक्ती नसल्याने या प्रकरणाबाबत काेणताही निर्णय ...

41 proposals of Farmers Accident Insurance Scheme pending for eight months | शेतकरी अपघात विमा योजनेचेे ४१ प्रस्ताव आठ महिन्यांपासून प्रलंबित

शेतकरी अपघात विमा योजनेचेे ४१ प्रस्ताव आठ महिन्यांपासून प्रलंबित

. नवीन याेजना सुरू हाेऊन चार महिने झाले तरी अद्यापही नवीन विमा कंपनीची नियुक्ती नसल्याने या प्रकरणाबाबत काेणताही निर्णय हाेऊ शकलेला नाही. प्रस्तावावर काेणताही निर्णय न झाल्याने संबंधित शेतकरी, त्यांचा परिवार या याेजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांना काम करताना हाेणारे अपघात आणि शेतात सर्पदंश, शाॅक लागणे आदी विविध कारणांमुळे अपघात अथवा मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला मदत मिळावी या उद्देशाने शासनाकडून गाेपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा याेजना राबवण्यात येते. संबंधित याेजनेचा लाभ विमा कंपनीमार्फत शेतकरी व त्याच्या परिवाराला दिला जाताे. या याेजनेत अपघाती मृत्यू अथवा पूर्णत: अपंगत्व आल्यास दाेन लाख रुपये तर एक हात, एक पाय अथवा अर्ध अंगास अपंगत्व आल्यास एक लाखापर्यंतची मदत केली जाते. गेल्या वर्षी त्याची मुदत डिसेंबरमध्ये संपली. त्यानंतर काेराेना व इतर कारणामुळे नवीन याेजना सुरू हाेऊ शकली नाही. मात्र एप्रिलपासून नवीन याेजना सुरू झाली आहे..

२०१९-२०२०ची शेतकरी अपघात विमा प्रस्ताव व मंजुरीची आकडेवारी

विमा कंपनीकडे १२२ प्रस्ताव दाखल, विभागाकडे प्रलंबित ४१ प्रस्ताव, विमा कंपनीकडून ५६ मंजूर प्रस्ताव, नामंजूर केलेले १५ प्रस्ताव आहेत.

योजनेचा काेणाला मिळताे फायदा

राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नाेंद नसलेले काेणतेही एक सदस्य (आई-वडील), शेतकऱ्यांची पती,पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी काेणतेही एका व्यक्ती असे १० ते ७५ वयाेगटातील एकूण २ जणांना अपघाती विमा संरक्षण एक शेतकरी व एक शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींना दिला जाताे, अशी माहिती कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली.

१२२ पैकी ५६ प्रस्ताव मंजूर; १० प्रकरणे प्रलंबित

शेतकरी अपघात विमा याेजनेसाठी २०१९-२०२० या काळात ॲानलाइन १२४ जणांकडून नाेंदणी केली हाेती. त्यापैकी १२२ प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाले. त्यातील ५६ प्रकरणे विमा कंपनीकडून मंजूर झाले हाेते. तर १५ प्रस्ताव विविध कारणामुळे विमा कंपनीकडून नाकारले हाेते. तर १० प्रकरणे अद्यापही विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत.

शेतकरी याेजनेत समाविष्ट अपघाताचे प्रकार असे

रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू,सर्पदंश, खून, उंचावरून पडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून हत्या, जनावरांचा हल्ला अथवा चावा घेतल्याने येणारा मृत्यू, दंगल आदी अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यास मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमाद्वारे आर्थिक लाभ मिळू शकताे.

नवीन याेजना ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ या काळासाठी राबवण्यात येत आहे. मात्र आताच हंगामाला सुरुवात झाली आहे. आता त्यासंदर्भातील प्रस्ताव येतील, त्याबाबत पडताळणी करून व कागदपत्रांची पूर्तता असणाऱ्या प्रस्तावांना याेजनेचा लाभ विमा कंपनीकडून मिळवून दिला जाईल असेही कृषी कार्यालयातून सांगण्यात आले.

Web Title: 41 proposals of Farmers Accident Insurance Scheme pending for eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.