३० पाड्यांना मिळणार नळाद्वारे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:42 IST2021-09-24T04:42:17+5:302021-09-24T04:42:17+5:30
प्रत्येक गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र अथवा राज्याच्या काही योजना आहेत. त्यामार्फत गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र जिल्ह्यात ...

३० पाड्यांना मिळणार नळाद्वारे पाणी
प्रत्येक गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र अथवा राज्याच्या काही योजना आहेत. त्यामार्फत गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र जिल्ह्यात असे अनेक पाडे आहेत की, जिथे गेल्या ७० वर्षांमध्ये पाणी पुरवठ्याची एकही योजना पोहोचलेली नाही. या पाड्यांवरील ग्रामस्थांना दूरवर पायपीट करीत ऊन, पाऊस सहन करीत पाणी आणावे लागत होते.
२५० लोकसंख्या असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी किमान हातपंप तरी केला जातो. मात्र पाड्यांवर दहा-पंधराच घरे असल्याने, त्याठिकाणी पाणी पुरवठ्याची कुठलीही सोय आतापर्यंत करण्यात आलेली नाही. परंतु आता केंद्र शासनाची जलजीवन मिशन ही योजना असून, या योजनेच्या माध्यमातून आता प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ३० पाड्यांनाही त्याचा लाभ होणार आहे. यात सर्वाधिक फायदा शिरपूर तालुुक्यातील २४ पाड्यांना होणार आहे. त्याखालोखाल साक्री तालुक्यातील चार व धुळे व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी एका-एका पाड्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ४ कोटी ४० लाख रुपये खर्च येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले.
धुळे - रामनगर (नगाव). साक्री - हट्टी बुद्रुक (खामपाडा), टेंभे प्र.वार्सा (झरीपाडा), नवडणे (तेलकराई), अंबाजीनगर (दिघावे), शिरपूर- सुभाणपाडा (बोरपाणी), हापसिंगपाडा (चाकडू), गुंजऱ्यापाडा (बोरपाणी), समऱ्यादेवी (गुऱ्हाडपाणी), सरदारपाडा (चाकडू), नवादेवीपाडा (कोडीद), मारुतीपाडा (शेमल्या), इगन्यापाडा (फत्तेपूर), रामबर्डी (हिवरखेडा), प्रधानदेवी (गुऱ्हाडपाणी), दोंडवाड (महादेव दोंदवाड), रामपुरी (वरझडी), कुत्र्यापाडा (आंबे), बंथोरपाडा (जोयदा), देवसिंगपाडा (खंबाळे), खड्डापाडा (आंबे), अंबडपाडा (वरझडी), चिखलीपाडा (खैरखुंटी), नवापाडा (मुखेड), कोळश्यापाणी (मोहिदा), गोदी (सावेर), आसरापाणी (हिवरखेडा), लोटनपाडा (हिगाव), जामन्यापाडा (कोडीद). शिंदखेडा - रूपनरवाडी.