गव्हाणे फाट्यावर पिकअप वाहनाचा अपघात, ३ मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 11:23 IST2020-08-04T11:23:08+5:302020-08-04T11:23:39+5:30
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग : ३० ते ३५ मजुर जखमी

गव्हाणे फाट्यावर पिकअप वाहनाचा अपघात, ३ मजूर ठार
धुळे : धुळ्याच्या दिशेने मजूर घेऊन येणाऱ्या पिकअप वाहनाचा अचानक टायर फुटला़ यामुळे पिकअप वाहन उलटल्याने अपघात झाला़ यात २ ते ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला़ तर, पिकअप वाहनात असलेले ३० ते ३५ मजूर जखमी झाले आहेत़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे फाट्यावर सकाळी अपघात झाला़ अपघातानंतर महामार्गावरुन वावरणाºया अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली़ प्रचंड आक्रोश यावेळी झाला़ जखमी आणि मृतांना पिकअप वाहनाच्या बाहेर काढण्यात आले़ नरडाणा आणि सोनगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले़ या अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले होते़