गवळी समाजाच्या मेळाव्यात ३ विवाह जुळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 19:48 IST2021-02-07T19:48:04+5:302021-02-07T19:48:16+5:30
धुळे - गवळी समाजाच्या वधू-वर, पालक परिचय मेळाव्यात ३ विवाह जुळल्याची माहिती आयोजकांनी दिली. येथील संतोषी माता चौकातील कल्याण ...

गवळी समाजाच्या मेळाव्यात ३ विवाह जुळले
धुळे - गवळी समाजाच्या वधू-वर, पालक परिचय मेळाव्यात ३ विवाह जुळल्याची माहिती आयोजकांनी दिली. येथील संतोषी माता चौकातील कल्याण भवन येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउदेशीय संस्थेने मेळाव्याचे आयोजन केले होते. गेल्या काळात कोरोनाने जगणे शिकवले म्हणून खर्चिक बाबींना फाटा देऊन सामूहिक विवाहांना प्राधान्य देण्याचा सूर गवळी समाज वधू-वर परिचय मेळाव्यात उमटला. मेळाव्यात धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक, पुणे, चाळीसगाव, उस्मानाबाद आदी ठिकाणांहून २७० उपवर वधू - वरासह पालकांनी सहभाग नोंदविला.
मेळाव्याच्या सुरुवातीला बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वालन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ पंच विठोबा बारसे होते. प्रमुख अतिथी म्हणून गणपत बिडकर (पुणे), लक्ष्मण खताडे (नगर), नगरसेवक भगवान गवळी, भागवत नागापुरे, लक्ष्मण खंदरकर, विठ्ठल उन्हाळे, नंदुरबार येथील संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे, जिल्हाध्यक्ष गोपाल लगडे, अशोक यादबोले, राजेंद्र लगडे, चाळीसगाव येथील नगरसेविका संगीता लगडे, सुभाष निस्ताने, सुपाजी पीरनाईक, अण्णाप्पा चिपडे, जळगाव जिल्हाध्यक्ष कृष्णा गठरी, रवींद्र परळकर, प्रकाश लंगोटे आदी उपस्थित होते. यावेळी शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य धाकलूआप्पा औशिकर, आणि धुळे तालुक्यातील बळाने ग्रामपंचायत सदस्य देवा आंजीखाणे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भीमराज घुगरे यांनी केले. सूत्रसंचालन राजू पंगुडवाले यांनी केले तर आभार ज्येष्ठ सल्लागार किसन जोमीवाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल जोमीवाळे, किशोर झारखंडे, नाना अंजीखाणे यांनी परिश्रम घेतले.
३ विवाह जुळले - मेळाव्यात ३ विवाह जुळले. आणखी विवाह जुळण्याचा विश्वास संघटनेचे अध्यक्ष भीमराज घुगरे यांनी व्यक्त केला. संघटनेच्या वतीने दुसऱ्यांदा अशा स्वरूपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.