मुख्यमंत्र्यांना शिरपूर भाजपाकडून २५० पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST2021-09-02T05:17:54+5:302021-09-02T05:17:54+5:30
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, भाजपा प्रदेश ...

मुख्यमंत्र्यांना शिरपूर भाजपाकडून २५० पत्रे
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आमदार काशिराम पावरा, तालुकाध्यक्ष किशोर माळी, भा. ज. यु. मो. जिल्हाध्यक्ष अशुतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर भा. ज. यु. मो. तालुकाध्यक्ष आकाश धनराज मराठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता युवा मोर्चा तालुक्याच्यावतीने २५० पत्र पाठविली आहेत.
थाळनेर टपालातून मलबार येथील वर्षा बंगला या निवासस्थानी पोस्ट करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला हीरक महोत्सव म्हणून संबोधले, तर हा हीरक महोत्सव नसून अमृत महोत्सव होता, ही आठवण म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आली आहेत.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आकाश मराठे, पंचायत समिती सदस्य विजय बागुल, माजी उपसरपंच धनराज मराठे, उपसरपंच वामन कोळी, ग्रा. पं.चे माजी सदस्य उज्ज्वल निकम, ग्रा. पं. सदस्य नवनीत वाडीले, रमेश शिरसाठ, डोंगर कोळी, प्रेमचंद शिरसाठ, जितेंद्र माळी, सुनील बोरसे, भटू शिरसाठ, कैलास माळी, विकास पाटील, मनोज मराठे, मधुकर शिरसाठ, मनोज बागुल, किशोर भिल, प्रमोद मराठे, शरद मराठे, किशोर मराठे, योगेश मराठे, यज्ञेश लोहार, अरुण रायसिंग, कपिल पाटील, गणेश शिंदे व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.