पीएम केअर, हापकीनकडून जिल्ह्याला २५ व्हेंटिलेटर; यातील १२ बंदच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST2021-05-13T04:36:23+5:302021-05-13T04:36:23+5:30

धुळे : पीएम केअर आणि हापकीनकडून जिल्ह्याला मिळालेले २५ पैकी १२ व्हेंटिलेटर तांत्रिक अडचणींमुळे वापराविना पडून आहेत. हिरे वैद्यकीय ...

25 Ventilators to the District from PM Care, Hopkin; Only 12 of them are closed! | पीएम केअर, हापकीनकडून जिल्ह्याला २५ व्हेंटिलेटर; यातील १२ बंदच!

पीएम केअर, हापकीनकडून जिल्ह्याला २५ व्हेंटिलेटर; यातील १२ बंदच!

धुळे : पीएम केअर आणि हापकीनकडून जिल्ह्याला मिळालेले २५ पैकी १२ व्हेंटिलेटर तांत्रिक अडचणींमुळे वापराविना पडून आहेत.

हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला दिलेले सर्व नऊ व्हेंटिलेटर रुग्णांसाठी वापरले जात आहेत. हिरे रुग्णालयात मोठा ऑक्सिजन टॅंक असल्याने त्यांना शक्य झाले आहे.

परंतु, धुळे जिल्हा रुग्णालय आणि त्याअंतर्गत असलेले शिरपूर आणि दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात मात्र तांत्रिक अडचणींमुळे व्हेंटिलेटरचा पूर्ण क्षमतेने वापर करणे शक्य होत नाही.

व्हेंटिलेटरसाठी जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते. परंतु, या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडरवर काम चालविले जाते. व्हेंटिलेटरला सिलिंडर लावले तर ऑक्सिजन लवकर संपतो. शिवाय जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये जनरल मेडिसीन एमडी डाॅक्टर उपलब्ध नसल्यानेही मोठी अडचण होत आहे. येत्या एक-दीड महिन्यात जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प सुरू झाल्यानंतर सर्व व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेने वापरणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक माणिक सांगळे यांनी ‘लोकमत’ला दिली.

दरम्यान, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी ऑक्सिजन प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या.

संसर्ग ओसरतोय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग ओसरतो आहे. रुग्णांची संख्या कमी होत असून, गंभीर रुग्णांची प्रमाणही बऱ्यापैकी खाली आले आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बेडसाठी वेटिंग नाही.

तज्ज्ञ डाॅक्टरांचा अभाव अन् तांत्रिक अडचणी

जिल्हा रुग्णालय

जिल्हा रुग्णालयात दोन व्हेंटिलेटर आहेत. परंतु, ऑक्सिजन प्रेशरची तांत्रिक अडचण आणि जनरल मेडिसीन एमडी डाॅक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे वापरात नाही. परंतु, भूलतज्ज्ञ उपलब्ध असल्याने आवश्यकता भासल्यावर वापरात येतात.

उपजिल्हा रुग्णालये

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व पाच व्हेंटिलेटर याच कारणांमुळे वापरात नाहीत. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात चार व्हेंटिलेटर सध्या वापरात आहेत. ऑक्सिजन प्रकल्प सुरू झाल्यावर सर्व व्हेंटिलेटर सुरू करता येणार आहेत.

हिरे रुग्णालय

हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जनरल मेडिसीन एमडी डाॅक्टर उपलब्ध आहेत. तसेच मोठा ऑक्सिजन टॅंक असल्याने व्हेंटिलेटरसाठी आवश्यक ऑक्सिजन दाब मिळतो. त्यामुळे सर्वच्या सर्व व्हेंटिलेटर सुरू आहेत.

जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरसाठी आवश्यक तज्ज्ञ डाॅक्टर नाहीत. ऑक्सिजनचा प्रेशर व्हेंटिलेटरला सपोर्ट करत नाही. भूलतज्ज्ञ आहेत. तातडीची गरज म्हणून ऑक्सिजन सिलिंडरवर व्हेंटिलेटर चालविले जातात. ऑक्सिजन प्रकल्प झाल्यावर सर्व व्हेंटिलेटर वापरता येतील.

- माणिक सांगळे, शल्य चिकित्सक

Web Title: 25 Ventilators to the District from PM Care, Hopkin; Only 12 of them are closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.