शिरपूर शहरातून ८३ हजारांच्या २५ बकऱ्या चोरल्या, दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:41 IST2021-09-23T04:41:18+5:302021-09-23T04:41:18+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर शहरातील यशोदानगरात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात १६ सप्टेंबर रोजी रात्री ही चोरी झाली असावी. आपल्या पशुधनातून ...

25 goats worth Rs 83,000 stolen from Shirpur city, case registered against two suspects | शिरपूर शहरातून ८३ हजारांच्या २५ बकऱ्या चोरल्या, दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरपूर शहरातून ८३ हजारांच्या २५ बकऱ्या चोरल्या, दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर शहरातील यशोदानगरात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात १६ सप्टेंबर रोजी रात्री ही चोरी झाली असावी. आपल्या पशुधनातून २५ बकऱ्या गायब असल्याचे निदर्शनाला आल्यावर बकऱ्यांचे मालक भास्कर सीताराम धनगर (४३, रा. नथुनगर, शिरपूर) यांनी शहराच्या परिसरात बकऱ्यांचा शोध घेतला. परंतु त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे बकऱ्या चोरीला गेल्याची खात्री त्यांना पटली. तसेच दोन संशयितांनी या बकऱ्या चोरल्या असाव्यात अशी माहितीही त्यांना मिळाली. ६३ हजार रुपये किमीच्या ७ मोठ्या बकऱ्या आणि २० हजार रुपये किमतीच्या ५ लहान काठेवाडी बकऱ्या चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी भास्कर धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विक्रम शर्मा आणि अन्य एका अज्ञात इसमाविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेड काॅन्स्टेबल शिरसाठ करीत आहेत.

Web Title: 25 goats worth Rs 83,000 stolen from Shirpur city, case registered against two suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.