२४६ बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवासी मात्र बेफिकीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST2021-09-17T04:42:46+5:302021-09-17T04:42:46+5:30
धुळे : कोरोनाची संभाव्य तिसरी लाटेपासून बचाव करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्यात येऊ लागल्या आहेत. त्यात एसटी महामंडळही ...

२४६ बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवासी मात्र बेफिकीर !
धुळे : कोरोनाची संभाव्य तिसरी लाटेपासून बचाव करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्यात येऊ लागल्या आहेत. त्यात एसटी महामंडळही मागे राहिलेलेन नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी बसेसवर ‘अँटीमायक्रोबियल केमिकलचा कोटींग’करण्यात येत असून, जिल्ह्यातील सुमारे २४६ बसेसला अशाप्रकारचे कोटींग करण्यात आले आहे. एसटीने प्रवाशांची काळजी घेतलेली असली तरी प्रवाशी मात्र पाहिजे त्या प्रमाणात काळजी घेत नसल्याचे चित्र बसेस मध्ये दिसून येते.
कोरोनाच्या दोन लाटेचा फटका एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात बसला. दोन्हीवेळेस काही महिन्यांसाठी बससेवा पूर्णत: बंद असल्याने, महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. काही कालावधीनंतर बससेवा सुरू झाली तरी सुरक्षितेच्या कारणास्तव प्रवासी बसमध्ये चढायला तयार होत नव्हते. त्यामुळे महामंडळाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून बसेसवर ‘अँटीमायक्रोबियल केमिकलचा कोटींग’चा निर्णय घेतला. त्यानुसार कोटींक करण्यात आले.
एका एसटीला वर्षातून चारवेळा होणार कोटींग
बसला अशाप्रकारे कोटींग करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्यासाठी एका बसला किमान ९ हजार रूपये खर्च येणार आहे. हे केमिकल विषाणूरोधक म्हणून काम करेल. एका एसटीला वर्षातून चारवेळा कोटींग करण्यात येणार आहे.
बाधित व्यक्ती उठून गेल्यावर धोका नाही, पण बाजुलाच बसला असल्यास?
बसचे ज्या प्रकारे कोटींग होणार आहे, त्यामुळे कोरोनाबाधित प्रवाशाचा स्पर्श झाला तरी कोरोनाचा विषाणू या ठिकाणी राहू शकत नाही.
बाधित व्यक्ती बाजुला बसला असल्यास त्यापासूनही प्रवाशाची सुरक्षितताच आहे. मात्र एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही कोरोनाच्या नियमांचे पुरेपूर पालन करणे गरजेचे आहे. तरच या कोटींगचा उपयोग होऊ शकेल.
प्रवाशी म्हणतात
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला निर्णय चांगला आहे. मात्र केवळ कोरोना आहे, म्हणूनच नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. बसेसच्या नियमित स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे.
आनंद पाटील
प्रवासी
एसटीने आर्थिक झळ सोसून हा निर्णय घेतलेला आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता राहणार आहे. परंतु कोरोनाच्या नियमांची एसटीत प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. चालक, वाहकच मास्क लावत नाही, त्यामुळे प्रवासीही त्यांचेच अनुकरण करतात. -भैरव पाठक
प्रवासी
धुळे आगारात असलेल्या एकूण बसेसपैकी आतापर्यंत ८३ बसगाड्यांना ‘ॲन्टीमायक्रोबियल केमिकल कोटींग’करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षिता वाढले. मात्र प्रवाशांनीही कोरोनाच्या नियम पाळावेत.
-स्वाती पाटील,
आगार व्यवस्थापक,धुळे