कोरोनाकाळात जिल्ह्यातील २३ मुली बेपत्ता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:04+5:302021-09-19T04:37:04+5:30
धुळे : कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील २३ मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत मुली हरवल्याची ...

कोरोनाकाळात जिल्ह्यातील २३ मुली बेपत्ता !
धुळे : कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील २३ मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत मुली हरवल्याची नोंद झाली आहे. तसेच मुले हरविण्याचेही प्रमाण वाढले आहे.
लग्नाच्या आमिषाला बळी पडलेल्या मुलींची संख्या अधिक आहे. हरवलेल्या मुली सापडण्याचे प्रमाणही कमी आहे. आतापर्यंत केवळ ३० टक्के मुलींचाच शोध लागला आहे.
३० टक्के मुलींचाच लागला शोध
कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील एकूण २३ मुली हरविल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाली आहे. त्यापैकी ३० टक्के मुलींचा शोध लागला आहे. शोध लागलेल्या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सात मुलांवर गुन्हे दाखल
अल्पवयीन मुलेही गुन्हेगारीकडे वळत आहेत. २०२० यावर्षी जिल्ह्यातील सात मुलांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना बाळ सुधारगृहात दाखल करण्यात आले आहेत. गंभीर गुन्हे दाखल नसले तरी बालगुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण धक्कादायक आहे.
जिल्ह्यातील एकूण बेपत्ता - ३१
मुले - ८
मुली - २३
२०२० मधील गुन्हे
खून - २७
बलात्कार - ३२
आत्महत्या - २४
खुनाचा प्रयत्न - ३१
भ्रूणहत्या - ००
मारहाण - ११९
अपहरण - २७
अल्पवयीनवर बलात्कार - ३
विनयभंग - ९२
सायबर क्राईम - ६२