नरडाणा येथे दुकानात २१ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 21:05 IST2020-07-26T21:05:05+5:302020-07-26T21:05:45+5:30
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे एका दुकानातून अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन हजारोंचा ऐवज लंपास केला़ नरडाणा-बेटावद रस्त्यावर उड्डाणपूलाच्या ...

dhule
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे एका दुकानातून अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन हजारोंचा ऐवज लंपास केला़
नरडाणा-बेटावद रस्त्यावर उड्डाणपूलाच्या अलीकडे एका हार्डवेअरच्या दुकानात २४ जुलै रोजी रात्री ही चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले़ शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला़ चार हजार रुपये किंमतीच्या पाण्याच्या मोटारी, साडेचारशे रुपये किंमतीचे स्टीलचे सहा नळ आणि दोन मिक्सर, आठ हजार रुपये रोख, सहा हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, तीन हजार रुपये किंमतीचे चांदीचे कडे असा एकूण २१ हजार ४५० रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला़
याप्रकरणी दुकानाचे मालक रवींद्र दिलिप बोरसे रा़ वारुळ ता़ शिंदखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नरडाणा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़