शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ट्रकसह २१ लाख ६६ हजारांचे रसायन जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:26 PM

इच्छापूर शिवारातील कारवाई : आठ जणांविरूद्ध साक्री पोलिसांत गुन्हा 

ठळक मुद्देबुधवारी पहाटे इच्छापूर शिवारातील कारवाई ट्रक, रसायने मिळून २१ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त सात जणांविरूद्ध कारवाई, मुंबईसह मध्यप्रदेशातील आरोपींचा समावेश

साक्री - तालुक्यातील साक्री-गंगापूर या वनविभागाच्या हद्दीत ट्रकसह २१ लाख ६६ हजार रुपये किमतीचे काळ्या रंगाचे रसायन (आॅईल) जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवारी पहाटे साक्री पोलिसांतर्फे करण्यात आली. हे रसायन विषारी असल्याचे माहिती असूनही हलगर्जीपणाने सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत टाकून विल्हेवाट लावल्याचेही आढळले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा सात जणांविरूद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मुंबईसह मध्यप्रदेश राज्यातील आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणी इच्छापूरचे पोलीस पाटील दादाजी मारनर यांनी साक्री पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार साक्रीपासून १२ कि.मी. अंतरावरील अक्कलपाडा धरणाच्या पात्रात बुधवारी मध्यरात्री एमएच १८ बीजी ६७०९ या ट्रकमध्ये २०० लिटर क्षमतेचे १०० लोखंडी ड्रम होते. आरोपींनी संगनमताने त्यात भरलेले तपकिरी-काळ्या रंगाचे रसायन (आॅईल) ते विषारी तसेच अग्निजन्य द्रव असल्याचे माहिती असून देखील हलगर्जीपणे नागरिकांच्या पिण्याच्या तसेच शेतकीकरीता उपयुक्त असलेल्या जलसाठ्यात टाकून तो दूषित केला. गैरकायदेशीर कामाच्या उद्देशाने आणून या रसायनाची विविध ठिकाणी विल्हेवाट लावली. तसेच ट्रकमालकाच्या संमतीशिवाय हा माल परस्पर भरून विक्री करून त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी १ लाख २६ हजार रुपये किमतीचे ६० लोखंडी ड्रम जप्त केले. त्यात तपकिरी काळ्या रंगाचे रसायन भरले असून प्रतिलिटर १० रुपये व लोखंडी ड्रम प्रत्येकी १०० रुपये अशी किंमत आहे. तसेच ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे २०० लिटर क्षमतेचे ३०० लोखंडी ड्रम त्यातही तपकिरी काळ्या रंगाचे रसायनच भरले आहे. यासोबत एमएच १८ बीजी ६७०९ या क्रमांकाचा १४ लाख १० हजार रुपये किमतीचा ट्रक असा एकूण २१ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक मोहिनोद्दीन कुदशद्दीन शहा (३८)  रा. टेगोर, सेंधवा, जि.बडवानी (मध्य प्रदेश), क्लिनर देवेंद्र शोभाराम चव्हाण (३०) तलकपुरा, जि.खरगोन, रमेश सरग रा.साक्री, बबलु यासीन शेख रा.गौशियानगर, पिंपळनेर, हॉटेल राजकमलचा मालक (नाव, गाव माहिती नाही), नवी मुंबई वाशी गल्ला मार्केट येथील महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे मालक अनिलभाई, रा. नवी मुंबई  व सलीमभाई रा.मुंब्रा या सात जणांविरूद्ध भादंवि कलम ४०६, ४२०, २७७, २८४, २८५, ३४ प्रमाणे साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी