१८ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हाकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST2021-05-14T04:35:22+5:302021-05-14T04:35:22+5:30
वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपींना हद्दपार करण्याचा प्रस्ताव देवपूर पोलीस ठाणे अणि आझादनगर पोलीस ठाण्यांकडून पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आलेला होता. ...

१८ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हाकलले
वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपींना हद्दपार करण्याचा प्रस्ताव देवपूर पोलीस ठाणे अणि आझादनगर पोलीस ठाण्यांकडून पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आलेला होता. त्यावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानुसार देवपूर पोलीस स्टेशन अंतर्गत १३ जणांचा समावेश आहे. यात सागर सुनील कांबळे (२६, रा. नेहरूनगर, वाडीभाेकर रोड, धुळे) व त्याच्या टोळीतील ऋषिकेश नरेंद्र भांडारकर रा. राजेंद्रनगर, गाेंदूर रोड, लखन ज्ञानेश्वर लोणारी रा. विटाभट्टी देवपूर, प्रफुल्ल दिनकर भोई रा. नगावबारी देवपूर, गौरव ऊर्फ जम्ब्या रमेश नरोटे रा. नेहरूनगर, वाडीभोकर रोड, धुळे, अजय अमृत कांबळे रा. नेहरूनगर, देवपूर, शुभम राजेंद्र देशमुख रा. बिलाडी रोड, देवपूर, अविनाश ऊर्फ पप्पू सुभाष अहिरराव रा. न्हावी कॉलनी देवपूर, राहुल प्रदीप सूर्यवंशी रा. मोचीवाडा देवपूर, बापू ऊर्फ अशाेक रामदास गांगुर्डे रा. नेहरूनगर, देवपूर धुळे, शुभम संजय भामरे रा.नेहरूनगर, देवपूर, अनिल त्र्यंबक लोणारी रा. साईबाबानगर, देवपूर, भैया माळी ऊर्फ धनंजय विकास सूर्यवंशी रा. मास्तरवाडी, नेहरूनगर, देवपूर या १३ जणांना एक वर्षाच्या मुदतीकरिता धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून हद्दपार करण्यात आले.
तसेच आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच जणांचा समावेश आहे. त्यात टोळीप्रमुख मनोज दिलीप वाडीले, रा. गायकवाड चौक, धुळे, रवींद्र ऊर्फ टिल्लू गबा सोनवणे रा. जुने धुळे, राकेश दिलीप वाडीले रा. गायकवाड चाैक, जुने धुळे, गौतम अशोक अंगरे रा. स्वामीनारायण कॉलनी, बाजार समिती परिसर, धुळे, भटू बडगुजर ऊर्फ मनोज रघुनाथ सूर्यवंशी रा. सूर्याेदय कॉलनी, वरखेडी रोड धुळे या पाच जणांना धुळे जिल्ह्यातून दोन वर्षांच्या मुदतीकरिता हद्दपार करण्यात आले आहे.