जिल्हा रुग्णालय - गुरुवारी प्राप्त ६३ अहवालांपैकी चार पाॅझिटिव्ह निघाले आहेत. त्यात धुळे शहरातील प्रमोद नगर, रामचंद्र नगर आणि देवपुरातून प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला आहे.
शिरपूर उपजिल्हा रुग्णालय - येथील ९५ पैकी २ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. त्यात पित्तरेश्वर काॅलनी, लक्ष्मीनारायण नगरातून एक रुग्ण आढळून आला आहे.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय- येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या १४ पैकी एकही अहवाल पाॅझिटिव्ह आला नाही.
साक्री भाडणे - येथील सेंटरवर ४८ अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यात एक अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यात म्हसदी विद्यालयात एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळला. तर रॅपिड अँटीजन टेस्टच्या ३ पैकी एकही अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - येथील १२ पैकी १ अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात अकबर चौकातील रुग्ण आढळून आला. जवाहर फाउंडेशनच्या लॅबमधील तपासणी केलेल्यापैकी जवाहर नगरातील एक अहवाल पाॅझिटिव्ह आला.
खासगी लॅब - शहरातील खासगी लॅबमधील २८पैकी ८ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. त्यात धुळे शहरातील कोरके नगरातील चार, कृष्णकमल हौसिंग सोसायटी जमनागिरी रोड एक, नेताजी हौसिंग सोसायटी एक, परिवहन कॉलनी पंचवटी गॅस एजन्सी जवळ देवपूर एक आणि धुळे तालुक्यातील शिरुड येथे जैन मंदिराशेजारील एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला आहे.