१५० अहवाल पॉझिटिव्ह, सहा रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 21:09 IST2020-08-03T21:09:36+5:302020-08-03T21:09:50+5:30
धुळे - जिल्ह्यातील आणखी १५० रूग्णांचे अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले. तसेच सहा रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांमंध्ये धुळे शहरातील दोन ...

१५० अहवाल पॉझिटिव्ह, सहा रूग्णांचा मृत्यू
धुळे - जिल्ह्यातील आणखी १५० रूग्णांचे अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले. तसेच सहा रूग्णांचा मृत्यू झाला.
मृतांमंध्ये धुळे शहरातील दोन पुरूष, धुळे तालुक्यातील नांदरे येथील महिला व निमगुळ येथील पुरूष तसेच शिंदखेडा तालुक्यातील म्हळसर येथील पुरूष व चिमठाणे येथील महिलेचा समावेश आहे.
सोमवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ८६ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. धुळे तालुक्यातील १०, शिरपूर तालुक्यातील २०, शिंदखेडा तालुक्यातील २६ व साक्री तालुक्यातील सात रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ३५७४ इतकी झाली आहे.