लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/सोनगीर : इंदूरकडून कारने सुरतकडे जाणाºया व्यापाºयांना सोनगीरजवळ पिस्तूलचा धाक दाखवून मारहाण करत सहा दरोडेखोरांनी तब्बल १५ लाखांची रोकड व ५५ हजाराचा अन्य ऐवज लुटून नेला़ ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली़ लुटारुंनी दोंडाईचा रोडवरील जंगलात हातपाय बांधून फेकून दिलेल्या तिघा व्यापाºयांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यानंतर सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला़ यासंदर्भात प्रविणसिंग दरबार (२२, चंद्रोमाला, जि़ पाटण, गुजरात) या कारचालकाने सोनगीर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार शनिवार २५ रोजी पहाटे जीजे ०५ आरसी ०१५६ क्रमांकाच्या कारने प्रविणसिंग दरबार, चमनभाई वाहतीभाई पटेल (४२) आणि जयप्रकाश जयंतीलाल व्यास (४२) हे तिघे इंदूर येथून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरुन सुरतकडे जात होते़ शनिवारी पहाटे दोन-सव्वादोन वाजेच्या सुमारास सोनगीर गावापासून काही अंतरावर महामार्गावर रस्त्यात एक गाडी आडवी लावण्यात आली होती़ त्यामुळे सुरतकडे जाणारी कार थांबली़ कार थांबताच ३० ते ४० वयोगटातील अनोळखी ६ दरोडेखोरांनी कारमधील तिघांना पिस्तूलचा धाक दाखवित बाहेर उतरविले़ हाताबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना इनोव्हा कारमध्ये बसविले़ त्यानंतर तिघांचे हातपाय बांधून पुन्हा मारहाण करत इनोव्हा गाडी सोनगीरकडून दोंडाईचा रोडकडे नेण्यात आली़ त्यादरम्यान लुटारुंनी गुजराती व्यापाºयांकडील १५ लाखांची रोकड, ४ मोबाईल, एटीएम कार्ड, लायसन्स असा एकूण १५ लाख ५५ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटला़ त्यानंतर तिघांना दोंडाईचा रोड परिसरातील जंगलात फेकून देत पळ काढला. दरम्यान बºयाच वेळानंतर तिघा व्यापाºयांनी स्वत: सुटका करत जवळचे सोनगीर पोलीस स्टेशन गाठले़ आणि पोलिसांना ‘आपबिती’ कथन केली. लुटारूंच्या मारहाणीमुळे जखमी झालेल्या तिघांना सोनगीर पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले़ प्रविणसिंग दरबार याच्या फिर्यादीवरुन अज्ञात सहा लुटारूंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपास करत आहेत.
सोनगीरजवळ पिस्तूलचा धाक दाखवत १५ लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 17:56 IST
महामार्गावरील घटना : गुजरातच्या तिघा व्यापाºयांना सहा जणांनी केली मारहाण
सोनगीरजवळ पिस्तूलचा धाक दाखवत १५ लाखांची लूट
ठळक मुद्देसोनगीरजवळ पहाटेचा थरारदरोडेखोरांनी लुटले तिघा व्यापाºयांना घटनास्थळी पोलीस अधीक्षकांची भेट