जिल्ह्यात १३ रुग्ण निघाले पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:22+5:302021-01-13T05:34:22+5:30
जिल्हा रुग्णालय - येथील कोविड सेंटरवर तपासणीसाठी आलेल्या ८० अहवालांपैकी एक अहवाल पाॅझिटिव्ह निघाला आहे. तो पाॅझिटिव्ह अहवाल ...

जिल्ह्यात १३ रुग्ण निघाले पाॅझिटिव्ह
जिल्हा रुग्णालय - येथील कोविड सेंटरवर तपासणीसाठी आलेल्या ८० अहवालांपैकी एक अहवाल पाॅझिटिव्ह निघाला आहे. तो पाॅझिटिव्ह अहवाल हा जिल्हा परिषदेतील आहे.
शिरपूर उपजिल्हा रुग्णालय - तालुक्यातून प्राप्त झालेल्या ३६ अहवालांपैकी चिलाणे येथील एक अहवाल पाॅझिटिव्ह निघाला आहे. तर तीन जणांच्या रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आले होते. त्या निगेटिव्ह निघाल्या.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय - येथील कोविड सेंटरवर तपासणीसाठी १७ अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी कार्ले येथील एक अहवाल पाॅझिटिव्ह निघाला आहे.
भाडणे ता. साक्री - येथील कोविड सेंटरवर तपासणीसाठी १०२ अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी नवापाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक अहवाल पाॅझिटिव्ह निघाला. तसेच तीन जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. तीनही निगेटिव्ह निघाले.
महानगरपालिका - येथे घेण्यात आलेल्या रॅपिड अँटिजन टेस्टमधील प्रमोद नगरातील दोन अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
धुळे तालुक्यातील मुकटी आरोग्य केंद्रातून ७९, आर्वी चार, नगाव सहा आणि शिरुड येथील ९१ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - येथील १६ अहवालांपैकी १ अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
जवाहर मेडिकल काॅलेजच्या लॅबमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत धुळ्याचा एक अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
खाजगी लॅब - शहरातील खाजगी लॅबमध्ये ३२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात पाच अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यात देवपुरातील विद्यानगर भागातील एक, फुलसिंग वाडी मोहाडी एक, जमनागिरी रोडवरील अशोक नगरातील एक, जयहिंद काॅलनीतील एक आणि यशवंत नगरातील एक असे एकूण १३ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४ हजार ५९३ वर पोहोचली आहे. मृत्यू एकही झाला नाही.