धुळे जिल्ह्यातील खरिपाच्या १३ पिकांना विम्याचे ‘कवच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 11:32 IST2019-06-04T11:31:22+5:302019-06-04T11:32:56+5:30

कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बंधनकारक

13 'Kharp' of insurance for Kharif crops in Dhule district | धुळे जिल्ह्यातील खरिपाच्या १३ पिकांना विम्याचे ‘कवच’

धुळे जिल्ह्यातील खरिपाच्या १३ पिकांना विम्याचे ‘कवच’

ठळक मुद्दे१३ पिकांसाठी योजना लागू२४ जुलैपर्यंत शेतकºयांना सहभागी होता येणारजिल्ह्यातील शेतकºयांना होणार फायदा

आॅनलाइन लोकमत
धुळे : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन प्रधानमंत्री पीक विमा योजना खरिप हंगाम २०१९ च्या मार्गदर्शन सूचनेनुसार जिल्ह्यात विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांना ही योजना बंधनकारक असून, कर्ज न घेणाºया शेतकºयांना ऐच्छिक आहे.
खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका, नागली, भात, तीळ सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस, खरीप कांदा या पीकांसाठी ही योजना लागून झालेली असून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत २४ जुलै १९ पर्यंत आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग , स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाºया नुकसानीस वैय्यक्तीक पातळीवर विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
पेरणीपासून काढणी पर्यंतच्या उत्पादनात येणारी घट यात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग, पीक पेरणी पूर्वी, लावणीपूर्वी अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित म मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रातव्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी ही योजना देय आहे.
काढणीपश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास, वैय्यक्तीकस्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे.
तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैय्यक्तीक स्तरावीर पंचनामे करून निश्चित केली जाणार आहे.
या योजनेत सहभागी झालेल्या शेतकºयांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत याबाबतची सूचना संबंधित बॅँक, कृषी, महसूल,विभागाला देणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांसाठी २४ जुलै १९ पर्यंत आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकºयांना गेल्यावर्षाप्रमाणेच फायदा होणार आहे.
१३ पिकांसाठी योजना लागू
२४ जुलैपर्यंत शेतकºयांना सहभागी होता येणार
जिल्ह्यातील शेतकºयांना होणार फायदा

Web Title: 13 'Kharp' of insurance for Kharif crops in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे