शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

खैरखुटी जंगलातून पकडला १२०० लिटर स्पिरीटचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 21:59 IST

सांगवी पोलिसांची धडक कारवाई। अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

पळासनेर : महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर शिरपूर तालुक्यातील खैरखुटी वन परिसरात अडीच लाखांचे १ हजार २०० लिटर स्पिरीट छापा टाकून जप्त केले़ शुक्रवारी रात्री सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली़ याप्रकरणी एकास अटक करण्यात आली़बनावट दारु निर्मितीसाठी वापरलेले जाणारे मानवी आरोग्यास असे घातक स्पिरीट रसायनाची अवैध तस्करी शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होते़ विशेषत: मध्यप्रदेश सिमा भागात बनावट दारु निर्मितीचा मोठा काळा धंदा फोफावला आहे़ त्यासाठी स्पिरीटची चोरटी वाहतुक आणि साठवणूक होत असते़ अशाच प्रकारे मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा गावडी भागातून स्पिरीटची तस्करी करुन दारु बनविण्याकरीता उपयोगात आणली जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली़ त्यावरुन ७ आॅगस्ट रोजी रात्री पोलिसांच्या पथकासह अभिषेक पाटील यांनी शिरपूर तालुक्यातील खैरखुटी वन परिसरात छापा टाकला़ खैरखुटी वन क्षेत्रातील नाल्याच्या काठी एक इसम हा पोलिसांना पाहून पळून जात असताना दिसून आला़ सिनेस्टाईल पाठलाग करुन त्याला पकडण्यात आले़ त्याची विचारपूस आणि पोलिसी खाक्या दाखविताच त्याने काडी आणि मातीच्या झोपडीमध्ये स्पिरीटने भरलेले मोठे बॅरल ठेवल्याचे दाखविले़ या झोपडीत प्रत्येकी २०० लिटरचे ६ बॅरल मिळून आले़ २ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे हे स्पिरीट पोलिसांनी जप्त केले़याप्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित श्यामू भगत (रा़ पळासनेर) याला मुद्देमालासह अटक करण्यात आली़ त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक खैरनर, कर्मचारी लक्ष्मण गवळी, योगेश मोरे, श्याम पावरा तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्ती पथकातील कर्मचारी अशोक पाटील, मयूर पाटील यांनी ही कारवाई केली़

टॅग्स :Dhuleधुळे