शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

१०७८ विवाहांसह आश्वासक वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:30 IST

जन्मबंध व्हॉट्सअप ग्रु्रप। मोफत समाजकार्याचा ठरतोय आदर्श नमुना

संडे हटके बातमीसुरेश विसपुते । लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जन्मबंध व्हॉट्स अप ग्रुपने नुकताच तब्बल १ हजार विवाहांचा पल्ला गाठला असून २ हजाराव्या विवाहाकडे आगेकूच सुरू केली आहे. समस्त सुवर्णकार समाजबांधवांमध्ये या ग्रुपने मोठा विश्वास निर्माण केला आहे. विवाह जमविणारा हा जगातील पहिलाच व्हॉट्सअप ग्रुप असावा! विवाह जुळविण्याच्या सध्याच्या अत्यंत कठीण काळात १ हजार विवाहांचा पल्ला गाठणे ही बाब गौरवास्पद तसेच प्रेरणादायी ठरली आहे. सोशल मीडियाचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग करता येतो, याचे जन्मबंध ग्रुप हे मूर्तीमंत उदाहरण ठरले आहे. मुंबई महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या प्रभाकर मोरे यांनी २०१५ साली विवाह जुळवण्यातील अडचणी लक्षात घेऊन या व्हॉट्सअप ग्रुपची सुरूवात झाली. आरंभी केवळ अहिर सुवर्णकार समाजातील उपवरांचा फोटोसह परिचय ग्रुपच्या माध्यमातून समाजबांधवांना करून दिला जात होता. मात्र वर्षभरापासून समाजातील लाड, पांचाळ, दैवज्ञ, झाडे, माळवी, वैश्य या अन्य आंतरशाखाही गरजेतून संलग्न झाल्या असून आतापर्यंत असे आंतरशाखीय ५८ विवाह संपन्न झाले आहेत. १४ वा मेळावा ५ मे रोजी सटाणा येथे तर १५ वा मेळावा आॅगस्ट महिन्यात संगमनेर येथे होणार आहे. या शिवाय सोलापूर, अकोला, पंढरपूर, अकोट येथील समाजबांधवही मेळाव्यांसाठी उत्सूक आहेत. या सर्व कार्यासाठी ४५० कार्यकर्ते मोफत सेवा देत असून रोज अनेक कार्यकर्ते या कार्याशी जुळत आहेत. समाजात या संदर्भात विपरित परिस्थिती असताना ‘जन्मबंध’ ग्रुपचे आगमन झाले. समाजाकडून एक नया पैशाची अपेक्षा न करता सुरू झालेल्या या उपक्रमाचे एक झंझावातात रूपांतर झाले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आज केवळ उपवर किंवा त्यांचे पालकच नव्हे तर समस्त समाजबांधव ‘जन्मबंध’ या एका सूत्रात बांधले जात आहेत. दोन्ही बाजूच्या वादविवादामुळे जे विवाह संकटात आले आहेत, अशा प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी राज्यात निरनिराळ्या ५८ ठिकाणी तंटानिवारण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समितीत ७ पुरूष व ३ महिलांचा समावेश केला आहे. अध्यक्षांच्या नेतृत्वात समिती सदस्यांनी १८ प्रकरणांमध्ये समेट घडविण्यात यश मिळविले आहे. वाद थांबवून मुली नांदण्यासाठी आल्या तर काही प्रकरणात मुलांनीही पुढाकार घेतला. यामुळे कटुता संपुष्टात आली असून आनंदाने हे संसार सुरू झाले आहेत.  १३ वधू-वर मेळावे झाले यशस्वी४आज या ग्रुपचे ३० हजार सभासद असून कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्टÑासह गुजरात, मध्य प्रदेश राज्यात विस्तारले आहे. वर्र्षानुवर्षे थांबलेली लग्ने यामुळे होत आहेत. या ग्रुपचे सद्यस्थितीत १८० व्हॉट्सअप ग्रुप असून त्याद्वारे ८ हजार उपवरांची नोंदणी झाली असून १३ वधू-वर मेळावे यशस्वीरीत्या पार पडले आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे