जिल्हात रोजगार हमी योजनेचे १० हजार ४४ कामे मंंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:38 IST2021-03-09T04:38:42+5:302021-03-09T04:38:42+5:30
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायत स्थरावर पाटबंधारे, रस्ते, राजीव गांधी भवन, जलसंधारण, घरकूल, सामाजिक वनीकरण, कृषी ...

जिल्हात रोजगार हमी योजनेचे १० हजार ४४ कामे मंंजूर
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायत स्थरावर पाटबंधारे, रस्ते, राजीव गांधी भवन, जलसंधारण, घरकूल, सामाजिक वनीकरण, कृषी अशा विविध कामे सुरू आहे. धुळे तालुक्यातील १६८ कामे सध्या सुरू आहेत. त्यासाठी ६०८ मजूर कामावर आहेत. शिंदखेडा १६१ कामांवर ७५७ कामे, शिरपूर ३०२ कामे १२०१ मजूर तर साक्री तालुक्यातील ४०२ कामांवर १४५६ मजूर कामाला आहे. दरम्यान राज्यात काेरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाचा निधी कोरोनावर खर्च करण्याचा आदेश असल्याने नवीन कामांना मंजुरी देता येऊ शकली नाही. त्यामुळे सध्या केवळ १०४४ कामे सुरू असल्याचे माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक कमी गावे
धुळे तालुका, साक्री, शिरपूर तसेच शिंदखेडा अशा चार तालुक्यात रोजगार हमी योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. कोरोनामुळे काही महिन्यापासुन कामे बंद पडल्याने पुन्हा नव्याने कामे सुरू झाली आहे. चारही तालुक्यातील सर्वात कमी कामे शिंदखेडा तालुक्यात आहे. तर सर्वात जास्त कामे साक्री तालुक्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.