२८ लाख ५० हजारात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:01 IST2019-11-12T22:00:42+5:302019-11-12T22:01:08+5:30

दोंडाईचा : रेल्वेत तीन सुशिक्षित तरुणांना दाखविले नोकरीचे आमिष

1 lakh 5 thousand cheats | २८ लाख ५० हजारात फसवणूक

२८ लाख ५० हजारात फसवणूक

दोंडाईचा : रेल्वेत लोकोपायलट असल्याचे भासवून बनावट ओळखपत्र व युनिफॉर्ममध्ये भेटून रेल्वेत नोकरी लावल्याचे आमिष तीन तरुणांना दाखविण्यात आले़ बँकेत पैसे नसल्याचे धनादेश देऊन तीन सुशिक्षित बेरोजगारांची २८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाºया संशयित आरोपीस दोंडाईचा पोलिसांनी अटक केली आहे़ त्यांना शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ 
शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथील निलेश रमेश बागल याने रेल्वेत लोकोपायलट पदावर नोकरीस असल्याचे सांगितले. रेल्वेचे बनावट ओळखपत्र, युनिफॉर्म परिधान करुन रेल्वेत असल्याचे भासविले. पीडित सुशिक्षित बेरोजगार व त्यांचा नातेवाईकांना मोबाईल किंवा प्रत्यक्ष भेटून बागल याने संपर्क केला. रेल्वे अधिकाºयाकडे माझी ओळख असून मी अनेकांना नोकरीस लावून दिले आहे. आपणास सुध्दा रेल्वेत नोकरी लावून देतो, अशी बतावणी केली. वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी भेटून  बेरोजगारांकडून पैसे घेतलेत. विश्वास बसावा म्हणून भारतीय स्टेट बँक व एचडीएफसी बँकेचे स्वत:चे सही करुन बागल याने बेरोजगारांना धनादेशपण सुपूर्द केलेत. 
अजय भिका धनगर यांच्या फिर्यादीनुसार संशयित निलेश रमेश बागल याने रेल्वेत असल्याचे भासवून  रेल्वेत नोकरी लावून देतो़ न वटणारे धनादेश देऊन  २८ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक लूट केली म्हणून दोडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक दिनेश मोरे यांनी संशयित आरोपी निलेश बागल यास मोठ्या शिताफीने अटक केली. सोमवारी आरोपी निलेश बागल यास दोंडाईचा पोलिसांनी शिंदखेडा न्यायालयात  हजर केले असता त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
दरम्यान, रेल्वे प्रमाणे इतर खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविणारी साखळी असल्याचे बोलले जात आहे़ 
मोठी साखळी असण्याची शक्यता
संशयित बागल याने महाराष्ट्र राज्य वीज पारेषण यात ज्युनिअर टेक्निशियन पदी कार्यरत असलेले अजय धनगर यांनी त्यांच्या नातेवाईकांना रेल्वेत नोकरी लागण्यासाठी निलेश बागल यास ९ लाख ५० हजार, ईश्वर धनगर यांनी १३ लाख व छबिलाल बेहरे यांनी ६ लाख असे २८ लाख ५० हजार रुपयांची  फसवणूक केली. नोकरी ही लागत नाही त्यामुळे संबंधीतानी आरोपी निलेश बागल याच्याकडे पैशाची मागणी केली़ धनादेश बँकेत वटवण्यासाठी टाकले असता  बँकेत पैसे नसल्याचे लक्षात आले. बेरोजगारांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यात मोठी साखळी असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात अजून कोणी स्थानिक सहभागी असल्याचे बोलले जात आहे़

Web Title: 1 lakh 5 thousand cheats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.