पिंपळनेरला अपघातात १ ठार, १ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 21:07 IST2020-07-22T21:06:54+5:302020-07-22T21:07:14+5:30
धुळे : भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर अन्य एक जण जखमी झाल्याची दूर्घटना ...

dhule
धुळे : भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर अन्य एक जण जखमी झाल्याची दूर्घटना १९ जुलै रोजी सायंकाळी घडली़
साक्री तालुक्याती पिंपळनेर येथे सटाणा रोडावर बल्हाणे फाट्यानजीक हा अपघात झाला़ सटाणाकडून पिंपळनेरकडे येणाऱ्या भरधाव वेगातील एम़ एच़ ०१ ए़ एक्स ६७६५ क्रमांकाच्या कारने समोरुन येणाºया एम़ एच़ ४१ एच़ ७०४५ क्रमांकाच्या मोटारसायकलीस जोरदार धडक दिली़ या अपघातात रोशन बापू सोनवणे (१७) तरुण जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेला प्रदीप देवीदास सोनवणे हा जखमी झाला़ हे दोघे साक्री तालुक्यातील मंदाणे येथील रहिवासी आहेत़ अपघातानंतर कारचालक फरार झाल्याचे सांगण्यात आले़
दरम्यान, याप्रकरणी बापू गंगाराम सोनवणे (६०, रा, मंदाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पिंपळनेर पोलीस ठाण्यात अनोळखी कार चालकाविरुध्द भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ४२७, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला़