जिल्हा परिषदेत उत्कृष्ट अभियंते, कंत्राटदार, पालकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST2021-09-16T04:40:41+5:302021-09-16T04:40:41+5:30
अभियंता दिन साजरा-बांधकाम विभागाने घेतला पुढाकार उस्मानाबाद : सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बुधवारी जिल्हा परिषद बांधकाम ...

जिल्हा परिषदेत उत्कृष्ट अभियंते, कंत्राटदार, पालकांचा सत्कार
अभियंता दिन साजरा-बांधकाम विभागाने घेतला पुढाकार
उस्मानाबाद : सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बुधवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने उत्कृष्ट अभियंते, कंत्राटदार तसेच पालकांचा सत्कार तसेच रक्तदान शिबिरही घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष अस्मिता कांबळे, तर प्रमुख अतिथी म्हणून बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, कृषी सभापती दत्ता साळुंके, पंचायत समितीच्या सभापती हेमा चांदणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, कार्यकारी अभियंता नितीन भाेसले, दशरथ देवकर, व्यंकटेश जाेशी यांची प्रमुख उपस्थिती हाेती. उपराेक्त मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट अभियंते, कंत्राटदार तसेच पालकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर कार्यकारी अभियंता नितीन भाेसले यांनी बांधकाम विभागाने आजवर केलेल्या कामाचा लेखाजाेखा मांडला. चालू आर्थिक वर्षातील कार्यारंभ आदेश प्रक्रिया गतीने झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले, तर स्थानिक लेखा परीक्षणातील १९७१ पासून प्रलंबित परिछेदाचा प्राधान्याने निपटारा केल्याचे देवकर म्हणाले. बांधकाम विभागाकडून चांगले काम सुरू असून, आम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहाेत, अशी ग्वाही सभापती साळुंके यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात कांबळे म्हणाल्या, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांपासून ते शहरी भागातील विविध क्षेत्रांत अभियंते कार्यरत आहेत. आपल्या नियमित कामकाजासाेबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही बांधकाम विभागाने वेळाेवेळी पार पाडल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन सुषमा घोळसे यांनी, तर आभार प्रदर्शन ओ. के. सय्यद यांनी मानले.